ओवीसी म्हणाले, ‘मोदीजी, सर्वात जास्त कंडोम तर मुस्लिम वापरतात’

ओवीसी म्हणाले, ‘मोदीजी, सर्वात जास्त कंडोम तर मुस्लिम वापरतात’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हैद्राबाद: काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मुस्लिम समाजावर टीका केली होती. मोदींच्या या टीकेला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. देशात सर्वाधिक कंडोम कोण वापरत असेल तर ते मुस्लीम लोक वापरतात असं उत्तर ओवेसींनी मोदींना दिले आहे.तसेच मोदींची एकच गॅरेंटी आहे ती म्हणजे दलित आणि मुस्लिमांचा द्वेष करणे असं म्हणत ओवेसी (Narendra Modi) यांनी मोदींवर तुफान हल्ला केला. हैदराबाद येथील एका आयोजित सभेत ते बोलत होते.

आपल्या भाषणात ओवैसी म्हणाले, या देशातील 15 टक्के लोकांना पंतप्रधान मोदी घुसखोर म्हणतात यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते? हे लोक दलित आणि मुस्लिमांचा द्वेष करतात. मोदी म्हणतात कि मुस्लिम लोक जास्त मुले जन्माला घालतात.. परंतु वास्तविक बघितलं तर नरेंद्र मोदींना स्वतः ६ भाऊ आहेत. अमित शाहा यांनाही ६ बहिणी आहेत. तर आरएसएसच्या संचालकांना सुद्धा १०- १२ भावंडे आहेत असं बोललं जाते. परंतु तरीही हे लोक मुस्लिमांच्या मुलांबाबत बोलतात, अशी टीका औवेसी यांनी केली.

मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार देशात मुस्लिमांचा प्रजनन दर सर्वात कमी आहे. दिवसेंदिवस मुस्लिमांची लोकसंख्या घटत आहे. देशात सर्वाधिक कंडोम कोण वापरत असेल तर ते मुस्लीम लोक वापरतात, असे मी म्हणत नाही, तर मोदी सरकारची आकडेवारी सांगते. मात्र, तरीही मुस्लीम लोक जास्त मुलं जन्माला घालतात, असा आरोप मोदी करत आहेत. मोदी हिंदूंच्या मनात भीती घालत आहेत कि मुस्लिमांनी जास्त मुले जन्माला घातली तर देशात एका विशिष्ट काळी हिंदूंपेक्षा जास्त संख्या मुस्लिमांची होईल. मोदी मुस्लिमांच्या बद्दल हिंदूंच्या मनात भीती घालत आहेत, पण असं काहीही होणार नाही असं ओवेसी यांनी म्हंटल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles