घर; नीला पाटणकर

घर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रत्येकाला आई नावाचं
एक रक्षणकर्त घर असत
आई नावाच्या घराला
सावरायला ते पुर असत ॥१॥

आई नावाचं घर असत
पडलेल बीळ बुजवाया
मायेच्या उबेच हक्काच
स्नेहाचं तोरण बांधाया ॥२॥

तिच्या सामर्थ्य्यावर
घर लागतं नांदायाला
अर्थ तिच्या प्रेमाचा,
लागतो कळायाला ॥३॥

अतिथीचं स्वागत असत
सुसंस्काराचं ब्रीद असत
अडीअडचणीत तोल धरून
आई नावाचं घर उभ असत ॥४॥

घराची शान राखून असतं
कधी लागल ढासळाया,
तर आधाराची झालर धरून
तेच येत असत सावराया ॥५॥

उत्कर्षाच्या काळात,
गर्वाने फुगत नसतं
ममतेचा पाझर ठिबकत
आनंदाचे क्षण खुलवत ॥६॥

कोडकौतुकाला सीमा नसते
वाममार्गा पासून दूर असतं
असं आई नावाचं एक
सुंदरसं घर नांदत असतं ॥७॥

घराचं घरपण जपत असत
उपहासाची भावना नसते
चूकांना माफी नसते
गुण्यागोविंदानं राहात असते ॥८॥

मायेनं प्रतिक्षा करणार रक्षणकर्त
आई नावाच एक घर असत
उघडलं की हृदयापासून
मोकळ-ढाकळ होत असतं ॥९॥

दारावर टकटकीची गरज नसते
आपसुक केव्हां ही उघडल जातं
अस एक आई नावाचं घर
प्रत्येकाला हवं असतं ॥१०॥

श्रीमती नीला पाटणकर
शिकागो

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles