उसनवारी प्रेमाची
ए…ऐक ना जरा….
हल्लीच आपल्याकडचा
प्रेमाचा स्टॉक संपला ना
असं करु या का आपण
प्रेमाची बी सी च काढू का ?
रोज थोडं प्रेम साठवत जाऊ
बरं तसं नसेल जमत तर….
महिन्याचीच बी सी काढू
दर महिन्याला प्रेम जमा करु
तुझं थोडंसं माझं थोडंसं….
बघ थेंबे थेंबे तळ्याप्रमाणे
आपलंही प्रेम सागराएवढं
मग अथांग अमर्याद होईल
वाटून घेऊ या दोघेही जण
कारण उसनवारी प्रेमाची…
नाही फायद्याची आपल्याला
व्याजासकट परतफेड करणे
कसे काय जमायचे तुला…..?
वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
=============