गुरुचे महत्त्व; ज्ञानेश्वर माशाळकर

गुरुचे महत्व



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

-:- गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.
-:- गुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की, ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.
-:- गुरु म्हणजे असे ज्ञान की, ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.
-:- गुरु ही एक अशी दीक्षा आहे की, ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.
-: गुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.
-:- गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.
-:- गुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.
-:- गुरु म्हणजे केवळ अमृतच. ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.
-:- गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.
-:- गुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.
-:- गुरू म्हणजे एक प्रसाद आहे ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छा उरत नाही.

गुरू

विद्यालय हेचि । पावन मंदीर ।
दिसेना तिमिर । विद्यालयी ।।

गुरू परमात्मा । खरा मार्गदाता ।
गुरूच विधाता । विद्यार्थ्यांचा ।।

गुरू सर्वोत्तम । गुरू हितकारी ।
विकार संहारी । गुरूदेव ।।

गुरू मातृतुल्य । गुरू शिष्यप्रिय ।
नेहमी सक्रिय । गुरूजन ।।

गुरूच्या छायेत । विद्यार्थी असता ।
येणार जगता । सन्मानाने ।।

गुरू शिस्तप्रिय । गुरू परीक्षक ।
गुरूच रक्षक । सगळ्यांचा ।।

गुरूच्या आज्ञेला । प्रसाद मानावे ।
चरणी झुकावे । त्यांच्या सदा ।।

गुरूची महिमा । अनादी अनंत ।
म्हणे साधू संत । गुरू थोर ।।

गुरूशिष्य अजु । गुरूस वंदतो ।
अभंग लिहतो । गुरू नामें ।।

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
बेडगा ता उमरगा, जिल्हा धाराशिव

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles