गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : वेदनेचे काहूर🌤️*
*🔹गुरूवार : ०९ / ०५ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿

*वेदनेचे काहूर*

*दुभंगले वचन दिलेले*
*वेदनेचे काहूर उठले*
*सोडलीस साथ माझी*
*भावनांचे रान पेटले*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌸🌀🌸♾️♾️♾️♾️
*वेदनेचे काहूर*

हृदयदर्पणी वसलाय सरिता तुझाच नूर,
कां नाही प्रांक्तनी माझ्या तुझ्या प्रितीचा पूर
दुसरीकडे भरभरून वाहताना तू….
उठतात गं मनी वेदनेचे काहूर…

*तारका रुखमोडे*
*अर्जुनी /मोर.जि.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌸🌀🌸♾️♾️♾️♾️
*चित्र चारोळी_वेदनेचे काहूर*

होतात समज गैरसमज
समजून घ्यावं एक दुसऱ्याला
साथ सोडून निघून जाऊन
वेदनेचे काहूर देऊ नये कोणाला

*सौ.शशी मदनकर ,ब्रम्हपुरी*,
*जिल्हा _चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌸🌀🌸♾️♾️♾️♾️
*वेदनेचे काहूर*

कुणी दुःख देता,भरून येते उर..
माजते वेदनेचे काहूर…
मनी वाटते हुरहूर…
नयनातून वाहतो अश्रूपूर…

*सौं. रजनी शिरीष कामडी*
*नागभीड चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌸🌀🌸♾️♾️♾️♾️
*वेदनेचे काहूर*

आजन्म साथीची दिली होती हमी
वेदनेचे काहूर देऊन गेलीस सोडून
विचार करतो मी कुठे पडलो कमी
अधूरी प्रीत ठेवली हृदयात जपून.

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🌸🌀🌸♾️♾️♾️♾️
*वेदनेचे काहूर*

समोर पाठमोरी पाहून ललना
अचंबित झाला तिचा सखा
वेदनेचे काहूर माजले मनात
पाहून सखीचा चेहरा नवखा…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌸🌀🌸♾️♾️♾️♾️
*वेदनेचे काहूर*

प्रेम सखी हृदयातील राणी,
परक्या संगे नातं तोडुनी,
स्वप्न भंगले भरुन आले ऊर,
तूझ्या विना मनी वेदनेचे काहुर,

*भास्कर गायकवाड चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌸🌀🌸♾️♾️♾️♾️
*वेदनेचे काहूर*

असे कसे तोडूनी बंधने
स्वतःला परक्याच्या हवाली केले
सोडूनी जाताना तू प्रिये
वेदनेचे काहूर मनी दडले

*पु. ना. कोटरंगे*
*ता. सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌸🌀🌸♾️♾️♾️♾️
*वेदनेचे काहूर*

हात सुटले साथ तुटली
तू गेलीस कायमची दूर
प्रितीचा खेळला लपंडाव
काळजात वेदनेचे काहूर

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌸🌀🌸♾️♾️♾️♾️
*वेदनेचे काहूर*

नेहमीच वेळेवर व्यक्त कराव्या
मनातील प्रेम भावना………….
अन्यथा जीवनभर वेदनेचे काहूर
देत राहतात विरह यातना…

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
💤💤💤💤🌀💤💤💤💤
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे.*
💤💤💤💤🌀💤💤💤💤
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles