“भावनांची राख होऊनही,आत धुमसतोय निखारा”; स्वाती मराडे

“भावनांची राख होऊनही,आत धुमसतोय निखारा”; स्वाती मराडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे काव्य परीक्षण

‘सुगंधाचं दान मागावं नि केवळ काटेच वाट्याला यावेत’. चकोर होऊन चांदण्यांची आस धरावी नि रात अवसेचीच पुढ्यात यावी. तृषा तृप्तीसाठी पाणी शोधायला जावं तर, केवळ मृगजळाचाच पाठलाग करायला लागावा. संथ जलावर अलवार तरंग उठावेत असे वाटावे; पण मोठा हादरा बसून अंतर्मन ढवळून भावनेच्या लाटाच नेत्रातून ओघळाव्यात‌‌. पहाट होण्याचं स्वप्न पहावं तर काळरात्रीने तेही गिळून टाकावं. पावसात चिंब व्हायचं असतानाच आसवांनी अभिषेक घालावा‌. जीवनी वसंत येणार ही आशा केवळ उंबराचं फूल ठरावी. किती हे चटके मनाला.. चटके सोसून राख राख झाली भावनांची पण तरीही आत धुमसतोय निखारा..वेदनेचे काहूर घेऊन..! कुठं माहित होतं एखाद्याला जीव लावण्याची सुद्धा किंमत चुकवावी लागते. जिवंतपणीच देहाचं कलेवर होते.‌ माणसांच्या गर्दीतही एकटेपण येते. आठवणींचा महापूर येतो नि त्या लाटेत मन गटांगळ्या खातं.

सगळ्या गुणदोषांसकट स्वीकारायला तयार होतो‌ मी तुला, पण प्रेम व्यक्त करायला कधी जमलंच नाही. शब्दांची जुळवाजुळव केली तरी ऐनवेळी शब्द दगा द्यायचे. कितीतरी वेळा मी प्रयत्न केला तुझ्या डोळ्यात माझे प्रतिबिंब शोधण्याचा. पण केवळ निर्विकार भाव दिसायचा‌. मग कधी व्यक्त होता आलंच नाही. तूही कधी जाणून घेतलं नाहीस.. कदाचित तुझी निवड वेगळी होती..‌अन् जेव्हा हे लक्षात आले तेव्हा पुढ्यात उभे राहिले वेदनेचे काहूर..!

उमगेल ना तुला कधी प्रीत माझी
हे बुद्धीस माझ्या पटलेले
कळत असूनही वळत नव्हते
मनात‌ वेदनेचे काहूर उठलेले..!

गोड गुलाबी प्रेमरंग चढलेला असतो मनावर..पण कधी कधी सामाजिक बंधनं, आर्थिक स्तर, परस्परांचे स्वभावदोष, प्रेम की आकर्षण यातील सूक्ष्म फरक. या ना त्या कारणाने वाट्यास येतो‌ प्रेमभंग. ‘सभोवती पाण्याचा दर्या असतो, पण तहान भागवणारी सरिता मात्र भेटत नाही’. प्रेमाची ऊब मिळण्याऐवजी होते ती होरपळ नि उठते वेदनेची कळ. याच आशयाचे चित्र आज ‘गुरूवारीय चित्रचारोळी ‘स्पर्धेसाठी आले. विरह वेदना हा कवीमनाचे संवेदन जागवून व्यथेची कथा मांडणारा विषय. या विषयावर अनुरूप असे आपण सर्व सारस्वतांनी मनाचा ठाव घेणारे लेखन केले. सर्व सहभागी रचनाकारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार..!!

सौ स्वाती मराडे,इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक, सहप्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles