समाजसेवक रामभाऊ इंगोले यांना मदतीची गरज

समाजसेवक रामभाऊ इंगोले यांना मदतीची गरज



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : रामभाऊ इंगोले देहविक्रय कराव्या लागणार्‍या दुर्दैवी महिलांच्या अपत्यांचा सांभाळ करणारे समाजसेवक म्हणून सुपरिचित आहेत. त्या सोबतच भटक्या मजुरांच्या मुलांच्या शिक्षण देऊन, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणारा अनाथ मुलांचा हा अनाम बाप आज जायबंदी झाला आहे. रामभाऊंना महिनाभरापूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. त्याचा खर्च काही अज्ञात दात्यांनी उचलला.

मात्र, आता त्यांना आराम करावा लागणार, औषधीचा खर्च आहेच, शिवाय ‘विमलाश्रम’च्या संचालनाचाही खर्च आहे. रामभाऊ त्यांचा व्यवसाय करून हा खर्च चालवित. आता तोही बंद पडला असल्याने त्यांना समाजानेच आर्थिक मदत करावी, असे आवाहन ‘आम्ही युवा’ संघटनेने केले आहे.

कधीकाळी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत नागपुरातील ‘गंगा-जमुना’ या बदनाम वसतीत जाऊन तेथील देहविक्रय करणार्‍या महिलांकडून राखी बांधून घेतली होती. त्यात कोवळ्या तरूण वयातले रामभाऊ इंगोले होते. राखी बांधली, फोटो छापून आले; पण आपण या आपल्या दुर्दैवी भगिनींसाठी काय करू शकतो, असा विचार रात्रभर केल्यावर रामभाऊंनी सकाळी या वसतीतील महिलांची दोन मुले पालकत्व स्वीकारून आणली. त्यानंतर गेली 40-50 वर्षे रामभाऊ अनेक संकटांवर मात करून या मुला-मुलींचा सांभाळ करत आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी विवाह केला नाही.

वडिलोपार्जित आणि स्वकष्टाजिंत संपत्तीही याच कामी खर्च केली. या कामासाठी त्यांनी कधीही कुणाकडून मदत मागितली नाही. शासनाकडून मदत घेतलेली नाही. अनेक छोटे-मोठे व्यवसाय करून आणि काही मित्रांनी, सहृदय लोकांनी केलेल्या मदतीवरच त्यांनी हा डोलारा सांभाळला आहे.

सततचा आर्थिक ताण, ती मुले- मुली वयात आल्यावर त्या वसतीतून त्यांना परत नेण्यासाठी होणार्‍या बळजोरीचा ताण यामुळे रामभाऊांना शुगर आणि बीपीचा त्रास अनेक वर्षांपासून जडला होता. आता हे जिवावरचेच दुखणे आल्याने त्यांची आर्थिक बाजू बघता आणि संपूर्ण विमलाश्रमाची त्यांच्यावर असलेली जबाबदारी बघता रामभाऊंना आर्थिक संकटांना सामना करावा लागतो आहे… त्यामुळे इतक्या मोठ्या समाजाने एकत्र येऊन थोर कार्य करणार्‍या या महानुभावाला खर्‍या अर्थाने आज मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही युवा संघटना त्यांच्या सोबत उभी आहे.

रामकृष्ण डोमाजी इंगोले, A/C क्रमांक 257210100005330 त्यांचा IFSC कोड UBIN0825727 आहे. त्याचा पिन कोड 440015 आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles