लाडीगोडी..
सोड ना अबोला,नाही करत मी बहाणा..
तुझ्यासारखाच तुझा रागही शहाणा..
कैक केले वादे,तुला भेटण्याचे..
मुहुर्त ना मिळाला,भेटीचा साजणा..
विरहात जीव सख्या पोळतो असा..
नसे तुजपरी राजा, कुणी देखणा..
नसे लाडीगोडी,वसे तुच हृदयात..
तुला कसा ना कळे,माझा निशाणा..
पावसाळा यंदाही का, कोरडाच जाई..
सांग काय देऊ,वरूणास दक्षिणा..
येण्या तुजपाशी,साज शृंगारही केला..
सांजवेळ झाली, तुझा ना लागे ठिकाणा..
सूर ताल जुळू दे, प्रेमगीत गावूया..
हाती हात घे सख्या, छेडू प्रीत तराणा..
हाती हात घे सख्या, छेडू प्रीत तराणा..
*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*