मायेचा ओलावा
चिमुकली पावलं
हळूहळू थबकली
आई आई म्हणत
ती बाईंकडे वळली
काही दिवस रडले
नंतर तेही रमले
अनोळखी विश्वात
स्वतःच होते गुंतले
नवी ओढ शाळेची
शाळेतील बाईंची
उणीव ना भासली
तिथे त्यांना आईची
संस्काराची शिदोरी
सोबतीस शिकवण
हसत खेळत आज
केली त्यांनी रुजवण
सात तास थांबतोय
बाई तुमच्याजवळ
मायेचा ओलावा हा
अन् तुमची कळकळ
सहारा प्रेमाचा तुम्ही
टिकवला बाळांसाठी
म्हणूनच पाळणाघर
चालू आमच्यासाठी……=
माधुरी काळे
ता.वणी,जिल्हा यवतमाळ
==========