अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ता मेळावा संपन्न
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- अ. भा. ग्राहक पंचायत जिल्हा नागपूर अंतर्गत हिंगणा तालुका शाखेच्या वतीने आज शनिवार दि.६ ऑगस्ट २०२२ ला सकाळी ११.०० वाजता तालुका स्तरावर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. सदर कार्यकर्ता मेळावा रायपूर ग्राम पंचायत कार्यालयातील सभागृहात घेण्यात आला. या सभेच्या निमित्ताने ग्राहक चळवळ आणि ग्राहकांचे हीत व कल्याण यांच्याशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायणराव मेहरे यांनी मेळाव्याचे अध्यक्षस्थान भुषविले. प्रमुख अतिथी म्हणून श्री.नितीन काकडे विदर्भ प्रांत सचिव, सौ. तृप्ती आकांत विदर्भ प्रांत संघटन मंत्री, श्री. नरेंद्र कुलकर्णी नागपूर जिल्हा संघटन मंत्री, बब्बुभाई शेख नागपूर जिल्हा उपाध्यक्ष,सौ. योगिता बैतुले जिल्हा महिला प्रमुख, सौ.दिपाली कोहाड उपसरपंच ग्रा.पं.रायपूर, श्री. राजु कोल्हे ग्राम विकास अधिकारी, श्री. प्रदीप वाभिटकर ग्राम विकास अधिकारी, श्री. दत्तात्रय अडयाळकर ग्रा.पं.सदस्य, सौ.वनिता राऊत ग्रा.पं.सदस्या, सौ.सुलभा कैकाडे ग्रा.पं.सदस्या, सौ.चित्रा ईटनकर ग्रा.पं.सदस्या, श्री जावेद महाजन ग्रा.पं.सदस्य आदि उपस्थित होते. प्रस्तुत सभेचे सुत्रसंचालन प्रा.दीपक रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन श्री. पांडुरंग काळे यांनी केले.
प्रस्तुत सभेच्या यशस्वीते करिता हिंगणा तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष श्री. गोविंदराव बुधे यांच्या मार्गदर्शना खाली सर्वश्री हरिष आंबटकर, मनोज झाडे, शैलेश किन्हेकर, बबलु शेटे, तामगाडगे, दांडेकर, नामदेवराव आमनेरकर, अॅडव्होकेट सौ. अर्चना सोनारे, सौ.शालिनी मनोहर, सौ.प्रज्ञा रामटेके, सौ.निलिमा नागदेवे, सौ.लोखंडे, सौ.निलिमा गोबाडे, आदिंनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्याला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.