१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या सत्काराला भरगच्च प्रतिसाद

१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या सत्काराला भरगच्च प्रतिसाद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील दक्षिण नागपूर येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रारंभी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन आमदार मोहन मते यांच्या संकल्पनेतून १० वी, १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भाग्यलक्ष्मी सभागृह जानकी नगर रिंगरोड येथील रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. नागपूर शहराचे उपाध्यक्ष संजय ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मोलाचा सल्ला देवून प्रोत्साहित करून देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि विद्यार्थ्यांचा सत्कार यांचा संबंध काय ? यावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मोहनभाऊ मते, देवेन दस्तुरे अध्यक्ष दक्षिण नागपूर, संजय ठाकरे नागपूर शहर उपाध्यक्ष, अमोल पुसदकर प्रवक्ते, सौ.ज्योतीताई देवघरे अध्यक्ष, भाजपा महिला आघाडी दक्षिण नागपूर, विनोद कडू महामंत्री दक्षिण, सौ.माधुरी ठाकरे, राजेंद्र सोनकुसरे, सौ.मंगला खेकरे आणि वार्ड अध्यक्ष बाबाराव तायडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

यावेळी वस्तीतील नागरिकगण,भाजप चे पदाधिकारी व पक्षातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेत तसेच कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबाराव तायडे आणि संचालन प्रवीण ठाकरे यांनी केले तर सौरभ तायडे यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles