सज्जनांची पाऊलवाट, हाच खरा धर्म!

सज्जनांची पाऊलवाट, हाच खरा धर्म!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

वर्धा :- सेवाग्राम हे फक्त भारतीय नव्हे ,इतर देशवासीयांचे ही आकर्षण आहे.कुतुहलाचा विषय आहे.मुळातच गांधीजी हे एक मानवी आश्चर्य आहे.असा कोणी माणूस भूतलावर जगला होता,हे भविष्यात खरे वाटणार नाही.एकवचनी राम,युगंधर श्रीकृष्ण सुद्धा आता आम्हाला काल्पनिक वाटू लागतात,तसेच गांधीजी सुध्दा कालांतराने काल्पनिक पात्र वाटू लागेल.गांधीजीचे जीवन आणि आज कांग्रेस नेत्यांचे जीवन यातील जमीन अस्मान चा फरक पाहाता, गांधीजी आणि कांग्रेस यांचा दुरान्वयानेही संबंध सांगणारा माणूस खोटा वाटू लागेल.इतिहास खोटा वाटू लागणे म्हणजे आमची विचारधारा पार विरोधात जाणे.उफराटी मानसिकता बनणे. सत्तर वर्षात हे अंतर कांग्रेस ने गाठलेले आहे.बॅरीष्टर असूनही कोट,पॅंट ,टाय उतरवून पंचा,उपरणे पांघरणारे गांधीजी आणि आमदार बनताच करोडोचा पसारा मांडणारा कांग्रेस नेता यातील फरक लिलया समजतो. यांच्यात कोणताही संबंध राहिलेला नाही.अगदी बादरायण संबंध सुद्धा नाही.इंटिग्रेटीव्ह,डेरीव्हेटीव्ह संबंध सुद्धा नाही.

गांधीजी आणि कांग्रेस यात झालेली फारकत पाहाता गांधीजी ही विभुती, अभिव्यक्ती,अनुभुती कांग्रेस व्यतिरिक्त अन्य अहिंसा,सत्य,अपरिग्रह,अस्तेय गुण असलेल्या लोकांनी जपली पाहिजे.तशी वेळ आलेली आहे.गांधीजिवन आणि गांधीविचार आता राष्ट्रीय धरोहर बनलेली आहे.गांधीजी आमचे नैशनल सिम्बॉल बनलेले आहेत. गांधीका देश,गांधी’ज नेशन म्हणजे इंडिया ,अशी ओळख जगातील कॉमन मॅन देतो. आम्ही इंडियन कॉमन मॅन ने हे विसरता कामा नये.

विकास की दौड मे इंडिया भकास हो रहा है.असे सेवाग्राम मधे शिकायला मिळाले.रशिया आणि युक्रेन युद्ध.ईराण इराक युद्ध. अमेरिका व्हिएटनाम युद्ध.अरबी देशातील निरंतर युद्ध.९।११चा विमान हल्ला ही माथेफिरू कारवाई मानवाचा सत्यानाश करीत आहे.तरीही आम्ही याला विकास म्हणतो.गर्वाने गप्पा मारतो.मानवी उत्थान ऐवजी मानवी अध:पतनकडे नेणारी कृती विकास असूच शकत नाही.मानवी दुरावा करणारी वृत्ती , प्रवृत्ती ,कृती धर्म असूच शकत नाही.इतके साधे,सरळ, सोपे तत्वज्ञान गांधीजींनी सांगितले.नव्हे अनुसरले.एका जन्मात हे अंगिकारणे शक्य होणार नाही.धर्माची अनेक ग्रंथ लिहीली गेली.इतकी कि तेच ग्रंथ अधर्मींचे लढाईचे हत्यार बनली.धर्मग्रंथातील ओळ सुद्धा खंजीर बनली. धर्मग्रंथातील ओळीचा अर्थ सांगतांना अनर्थ घडू लागला.भाष्यांतर,भावांतर सांगणाऱ्याचा मुडदा पडू लागला. खरा तो एकचि धर्म,येथे पाहायला मिळाला.यमराजाने युधिष्ठिराला विचारले,
“तू ज्ञानी आहेस तर सांग,खरा धर्म म्हणजे काय ?” तेंव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले,” सज्जन माणसाच्या जीवनातील पायवाट म्हणजे आमच्या साठी धर्म आहे.”तेंव्हापासून युधिष्ठिराला धर्म उपाधी दिली . “युधिष्ठिरा,तूच खरा धर्म जाणतोस.तूच तर धर्म आहेस.” ही सज्जनाची पायवाट येथे आहे.गांधीजींचा जीवनपट येथे घडला.ज्या वाटेने गांधीजी चालले,तोच खरा धर्म.धर्म पुस्तकात नसतो.तेथे फक्त धर्माचे वर्णन असते.धर्म माणसाच्या आचरणात असतो.ती जगण्याची कला आहे.ती जगण्याची राहाटी आहे.ती जगण्याची वृत्ती आहे.ती प्रवृत्ती आहे.ती कृती आहे.धर्मराठी धर्म जगत नसतात.ते धर्म सांगतात.कर्मराठी धर्म जगत असतात.त्यांच्या पाऊलखुणा धर्माची वाट बनते.येथे गांधीजीच्या पाऊलखुणा धर्माची वाट बनल्या आहेत.ग्रंथातील धर्म सांगणाऱ्यापासून सावध होण्याची वेळ आलेली आहे. सज्जनांच्या जगण्यातील धर्म चोखाळणे,अनुसरणे हेच खरे धर्माचरण आहे.मी फक्त एक दिवस जरी गांधीजी सारखा जगलो तरी समजतो,मला गांधीजी कळले.अन्यथा मी गांधीजींचा व्यापार कारणारा अधर्मी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles