बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील विजेत्यांच्या काव्यरचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ कविता स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : घडीभराचा डाव🥀*
*🍂बुधवार : ०६/ जुलै /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*घडीभराचा डाव*

अगदी बालपणातच सुरू
स्वप्नपूर्तीसाठी धावाधाव
जीवन आपले क्षणभंगूर
जणू घडीभराचा हा डाव…!!

आजच्या सर्व बालकांचा
शिक्षणाने हिरावला खेळ
शाळा क्लासेस यांच्यातच
संपून जातो दिवसाचा वेळ…!!

ना मैदानी खेळ खेळतात
ना पारंपरिक कुठले खेळ
कार्टून आणि मोबाईलमध्ये
यांच्या बालपणाचा ताळमेळ…!!

युग आजचे स्पर्धेचे आहे
मेंदू तरी किती धावणार
मूठभर मेंदूत सारे विश्व
सांगा कसे सामावणार…??

भाराभर पुस्तकात आज
अर्धे आयुष्य संपून जाते
जीवनाशी ताळमेळ नाही
असे पुस्तक हाती असते…!!

जेव्हा सारे समजते तेव्हा
संपलेला घडीभराचा डाव
जीवनप्रवास थांबलेला नि
किनाऱ्यावर आयुष्य नाव…!!

*✍️सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे बीड*
*कवयित्री/लेखिका/हायकूकारा*
*©सदस्या-मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💚🚩💚➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

क्षणभराचा पुळका
घडीभराचा डाव
उमळुन उसळतो
दुजा करतो घाव ॥

घडीभर डाव डाव करा
चारचाकीने फिरवा राउंड
चिल्ले पिल्ले रमवा लाडवा
करमणुक प्रवास सराउंड॥

उलशासाठी तावात येते
गमावल्याने केविलवाणा
पाणक्यावानी एकत्र होते
रग्गेलपणा होईना उणा ॥

काम नाही कवडीच
फुरसद नाही घडीची
वामापाही लया गेल
उमगल मोल तोडीची ॥

*प.सु. किन्हेकर*
*वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💚🚩💚➿➿➿➿
*घडीभरचा डाव*

घडीभरच्या डावाने
काय करामत केली
हसत खेळत होती ती
एका दमात खाली पडली

कोणी म्हणे बंडखोर
तर म्हणे कोणी लाचारी
या खुर्चीच्या नादात सारे
केली आपलीच घरफोडी

शत्रू आता मित्र झाला
घेऊन फिरतो खांद्यावर
राज्य आले जनतेचे
बसून सांगतो गादीवर

कामाचे काय सांगून बसले
दिले धडाधड आश्वासन
किती मार्गी लागतील हे
प्रश्न पडतो लोका; करेल का शासन

घडीभरात डावाने या
मोडला जनतेचा कंबरडा
विश्वास ठेवू कोणावर
विचारते सारी जनता….!

*✍️ पु. ना. कोटरंगे*
ता. सावली, जि. चंद्रपूर
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*

➿➿➿➿💚🚩💚➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿

*घडीभराचा डाव*

जीवन हे घडीभराचा डाव
खेळू तयाला आनंदाने
क्षण येई अंत्य घडीचा
कायम कुणी ना वास्तव्याने

भाग्य रेखिले विधात्याने
येणे जाणे हाती तयाचे
उगा कशाला गर्व फुकाचा
सूत्र आचरी मानवतेचे

श्रेष्ठत्वाची करूनी स्पर्धा
कशास हवी वरचढ रीती
परमात्म्याची सर्व लेकुरे
असो सर्वांशी समान प्रीती

बहरो बागा हर्षफुलांच्या
उजळो प्रत्येकाचे जीवन
ह्रदयी वसावे प्रत्येकाच्या
आदर्शाचे करूनी वर्तन

सत्कार्याची महती मोठी
जाता अंती उरेल किर्ती
धनसंपत्ती जागेवरती
कर्म अमर ते होई जगती

परदुःखाशी व्हावे समरस
नको टोचणी कुण्या जीवाला
तद्रूप व्हावे आत्मईश्वरी
मोक्षप्राप्तीचा मार्ग हा भला.

*श्रीमती सुलोचना मुरलीधर लडवे*
*साईनगर,अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💚🚩💚➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

घडीभराच्या डावाचा आला विचार
लेखणी कागदावर झरली झरझर ॥१॥

कागद-लेखणी नाते आगळे जुळले
एकदुजाचं प्रेम जगावेगळे दिसले ॥२॥

लेखणी लिहीण्या सज्ज झाली
अक्षरे साज-शृंगार लेवुनी आली ॥३॥

शब्द कागदावर ऐटीत लोळु लागले
शीघ्रगतीने पदन्यास करू लागले ॥४॥

अर्चनेनं काव्य प्रसन्न झाले
साधना आर्शिवच देऊन गेली ॥५॥

लिलया बोटं फिरू लागली
शब्दांना दिव्यत्व प्राप्त झाले ॥६॥

घडीभराच्या डावाने वरदहस्त ठेवला
अदाकारीचा छंद मनी जडून गेला ॥७॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿💚🚩💚➿➿➿➿
 *घडीभराचा डाव*

घडीभराचा डाव क्षणाचा
कसा नाचवतो कळेना
कठपुतली सारखा फिरवतो
कुणास समजुन येईना

आपसातच आपण सारेच
कामापुरते सगळे राहीत
प्रेमातच गोड बोलूनच
आपले काम भागून घेईत

कुणावरही कवडीचा विश्वास
अजीबात राहीला नाहीत
सर्व भेद उलगडून कसे
स्वार्थापोटी स्वतःच हित पाहीत

म्हणूनच घडीभराचा डाव
खेळासारखाच असतो
कोण आपले कोण परके
वेळ आल्यावर कळून येतो

*सौ पुष्पा डोनीवार ,चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💚🚩💚➿➿➿➿
*घडीभरचा डाव*

राजकारणात रंगला
घडीभरचा डाव
सतेच्या लोभासाठी
तोडतात बंधूभाव

लोकशाहीच्या राज्यात
लोकप्रतिनिधींचा तमाशा
जनतेच्या पैशावर
फिरून येतात दाहीदिशा

जनतेचे होतात हाल
डोळे यांचे सर्वत्र बंद
स्वतःच्या मतलबासाठी
पार्टी बद्दलविण्याचा छंद

न्यूज वाल्यांना यांचे वेड
तू तू मै मै शब्दाचे गाणे
अपक्ष लढणे नंतर एकत्र
सामान्य माणसाचे मरणे

वेळोवेळो सांगत फिरतात
प्रत्येक गोष्टीत नको राजकारण
घडीभरचा यांचा डाव
नुसतं दिखाव्याचे भांडण

*कुशल डरंगे,अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💚🚩💚➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

घडीभराचा डाव मांडला|
संसाराचा खेळ रंगला||

हरूनी कधी जिंकायाचा|
आनंदाने परी खेळायाचा|
रोज नव्याने जगण्याचा|
बंध रेशमी गुंफण्याचा|१|

दुःखाचे काटे वाटेवरती|
संकटेही सोबत असती|
अपमानाची सदैव भीती|
तरी जपावी आपली नाती|२|

कभिन्नकाळ्या मेघांवरी|
दिसे प्रकाशरेषा चंदेरी|
आशेची ही असे शिदोरी|
पंखांमध्ये ऊर्जा ही भरी|३|

दुःखालाही सौख्याची झूल|
पहाट रात्रीस देतसे हूल|
निराशेला आशेची भूल|
वणव्यामागे हिरवी चाहूल|४|

सूत्रधार या जीवनाचा|
आभास हा परी सत्याचा|
खेळ हा कठपुतळ्यांचा|
रंगलासे हो प्रारब्धाचा|५|

डाव कधीतरी सोडायाचा|
विचार सदा असावा याचा|
कुठे ना कधीही गुंतायाचा|
डाव भास नी आभासाचा|६|

डाव हसत हा खेळावा|
हर्षफुलांचा लुटूनी ठेवा|
नको विसर परी कर्तव्या|
मनी नित्य श्रीहरी स्मरावा|७|

*रचना ःवृंदा(चित्रा)करमरकर*
*सांगली जिल्हा: सांगली.*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿💚🚩💚➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

पशुपक्षी झाडे वेली
खेळणी तुझी परोपरी
खेळगडी नाती गोती
भातुकली नानापरी.

लाभला मानव देह
मांडला संसार डाव
घडीभराचा डाव प्राण्या
नको मला मला हाव .

स्वार्थाची नको सूडबुध्दी
नको चढाओढ लढाई
प्रेमाने मने जिंकावी
घामाची बरी कमाई .

कर्तव्याची जाण अंतरी
कृतज्ञ सर्वदा ज्येष्ठांशी
नको लालसा ऐश्वर्याची
समाधानी नित्य मानसी .

मानसात पहावा देव
अंधश्रद्धेचा खोटा भाव
वाहती गंगा जिणे निर्मळ
मात्र तीन प्रवेशाचा खेळ.

*सौ विमल धर्माधिकारी*
*वाई सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💚🚩💚➿➿➿➿
*घडीभराचा डाव*

ऊन सावल्यांचा खेळ हा,
गणिताच्या मांडण्या,
मोजाव्या इतक्या,
क्षणभर हसला, बोलला,
कुठे डाव मांडला हा
घडीभराचा डाव…..

मोठे स्वप्न बघतोय,
आनंदाने मोहरुन उठत,
ह्दयात असते स्वप्नांचे
मंदिर, ह्या आनंदात
होतात सहभागी
माहिती नसतं हा
घडीभराचा डाव.

नकळतच मैत्रीणीचे रुप,
घडीभराचा डाव हा
जुन्या आठवणींना उजाळा
मिळावा ह्या मराठीचे
शिलेदार समुहात,
माझ्या पाठीशी दादा,
ताईंचा ह्या लेखणीतून
आकार, शब्दात वळण.

केव्हा कोण येईल
केव्हा कोण जाणार,
घडी भराच्या दोन
शब्दात प्रेम,माया,
जिव्हाळा, रक्ताच्या,
दुधाच्या नात्याहूनही
प्रेमळपणा मिळावा.

*सौ.नंदा कामडी,चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles