
मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार प्रकरणात सक्रिय आहे हा हेमक्या, पीडित नागरिक आता दाखविणार त्याला खमक्या
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात सध्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणात मोठ्या प्रमाणात लुबाडणूक, फसवणूक व गैरप्रकार वाढले आहेत. यात गडचिरोलीस्थित एक ‘डाकू’ नावाने कुप्रसिद्ध व्यक्ती महत्वाची भूमिका पार पाडत असून आरमोरी मार्गावर त्याने केलेल्या एका गैरप्रकाराबाबत नागरिक व प्रशासकीय यंत्रणा त्या ‘हेमक्या’ ला आता ‘खमक्या’ दाखविण्याच्या तयारीत आहेत. याबाबत पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. याबाबत कुणाला अधिक माहिती किंवा तक्रार करावयाची असल्यास त्यांनी मराठी इ-न्यूज नेटवर्कचे संपादक नंदकिशोर पोटे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली येथे विविध गैरप्रकार करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा करणारा हा ‘डाकू’ यापूर्वीही पोलिसांच्या रडारवर आला होता. विविध जमीन खरेदी-विक्रीच्या क्लिष्ट, लुबाडणूक, फसवणूक प्रकरणात त्याचे नाव अग्रक्रमाने पुढे आले आहे. याबाबत बऱ्याच नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. दिशाभूल करणारी माहिती देऊन ग्राहकांना फसविणे, त्यांना धमकी देणे, असे प्रकार त्याच्याकडून घडत आहेत. या प्रकाराला बळी पडलेले लोक आजवर शांत होते. कारण हा डाकू त्यांना धमकी देत होता. मात्र आता डाकूविरोधात ठोस पुरावे गोळा करून आरमोरी मार्गावर असलेल्या आणि फसवणूक झालेल्या नागरिकांनी त्याच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. सर्व पुराव्यानिशी याबाबत पोलिस, महसूल विभागात तक्रार करण्यात येणार आहे. या ‘डाकू’ हेमक्याला ‘खमक्या’ दाखविण्यासाठी ज्यांच्याकडे तक्रार, ठोस पुरावे उपलब्ध आहेत, त्यांनी नंदकिशोर पोटे यांच्याशी 9511618163 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.