राजकारण बाजूला, विकासकारण महत्वाचे : नगराध्यक्ष योगिता पिपरे

गडचिरोली शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी व्यक्त केले. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ‘मराठी इ-न्यूज नेटवर्क’ शी ‘त्या’ बोलत होत्या. शहर स्वच्छ, सुंदर, समस्यामुक्त आणि प्रत्येक कुटुंब सक्षम होण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आपल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, नगरपरिषदेच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात राजकारणाला समाजकारणाची जोड देत नागरिकांनी नगराध्यक्ष कसा असावा, या अपेक्षेवर आपण खरे उतरत अल्पावधीतच समाजमन जिंकून घेत जनतेचा नगराध्यक्ष म्हणून नावलौकीक मिळविला आहे. समाजाला सोबत घेऊन चालण्याची वृत्ती व प्रत्येकाला मदतीचा हात देण्याची तयारी या गुणांमुळे नागरिकांनी आपल्याला शहराचा प्रथम नागरिक बनण्याची संधी बहाल केली. विकासाच्या बाबतीत उपेक्षित असलेल्या गडचिरोलीला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचा ध्यास बाळगत आपल्या नेतृत्वात साडेचार वर्षाच्या काळात शहरात विविध विकासकामांचे सत्र सुरू झाले. केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी खेचून आणत शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आपल्या प्रयत्नातूनच शहरातील ९६ कोटी रुपयांच्या भूमिगत गटारांच्या कामाला सुरुवात झाली आहे. ३ कोटी रुपयांच्या निधीतून आठवडी बाजाराचे रुपही बदलले आहे. शहरातील नागरिकांना २४ तास मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा मानस नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांनी व्यक्त केला. यासाठी त्यांनी मिटरद्वारे नळाचे पाणी देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचबरोबर सुभाष वॉर्डाच्या पाणीपुरवठ्यासाठी २.६ कोटी, विसापूरसाठी २.१६ कोटी तर शहरातील पाईपलाइनसाठी ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच शहराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी लांजेडा येथील तलावाजवळ ८ कोटी रुपयाचा बगीचा, यात चिल्ड्रेन पार्क, वाकिंग ट्रॅक आदीची व्यवस्था, स्वच्छता मोहीमेंतर्गत घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १० ऍरोटिप्पर, न.प.च्या १० शाळेत आरो वॉटर फिल्टर लावण्यात येत आहेत. यासोबतच १५ कोटींच्या निधीतून अंतर्गत रस्ते, ४६ कोटी नवीन पाणीपुरवठा प्रस्ताव, २ कोटी पांदण रस्ते विकास, १५ सार्वजनिक शौचालय, ओपन स्पेस जागेचा विकास करण्याकरिता ४.७८ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेत झाडे लावणे व हरित पट्टा कामांसाठी ५० लाख, आठ रस्त्यांच्या बांधकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला १४ कोटी ७८ लाख, दलित वस्ती सुधारण्यासाठी ५४ लाख, नगरोत्थानासाठी २ कोटी, विशेष रस्ता अनुदान ५० लाख, रस्ता अनुदान ६० लाख, जिल्हा वार्षिक योजनेतून अनुसूचित जातीसाठी उपाययोजनेवर ग्रंथालय व इतर योजनेसाठी ३० लाख, स्वच्छ भारत अभियानांतर्गत ८९ लाख असे १० कोटी रुपयांपैकी अनेक निधी खर्च झाला असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. प्रत्येक घरमालकाला प्रापर्टी कॉर्ड देण्याचे उद्दिष्ट असून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपरिषदेच्या १० शाळा डिजिटल केल्या असून या शाळेतील विद्यार्थ्यांना आरोचे शुद्ध पाणी पुरविले जाणार आहे. शहरात नगरपरिषद प्रशासन भवन, नाट्यगृह, बगिचा, जलतरण तलाव आदी कामे प्रस्तावित आहेत. भविष्याच्या काळात केंद्र व राज्य शासनाकडून अधिक निधी आणून शहराच्या मुलभूत सुविधांसाठी सदैव कटीबद्ध असल्याचे योगिता पिपरे यांनी सांगितले.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरातील नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी शहराचा विकास हाच ध्यास मनी बाळगून कामाला सुरुवात केली. राज्य व केंद्र शासनाकडून शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणत नगराध्यक्ष पिपरे यांनी साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विकासाला गती मिळवून दिली आहे. त्यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली शहराचा कायापालट होत असल्याचे दिसून येते.
शहराचा सर्वांगीण विकास म्हटल्यास सुरुवात शिक्षणापासून करावी लागेल. त्यामुळे योगिता पिपरे यांनी नगरपरिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या शाळांच्या विकासापासून कामाचा ‘श्रीगणेशा’ सुरू केला. नगरपरिषदेच्या दहा शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आरोचे शुद्ध पाणी मिळावे यासोबतच पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी कटाक्षाने लक्ष पुरविण्यात आले आहे. तसेच पंडित जवाहर नेहरू उच्च प्राथमिक नगरपरिषद शाळा रामनगर या आयएसओ दर्जा प्राप्त शाळेचे संपूर्ण डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. तसेच शाळेच्या वरच्या मजल्यावर पाच वर्गखोलींचे अद्ययावत बांधकाम व जुन्या तळमजल्यावरील वर्गखोल्याचे आधुनिकीकरण करण्यात आले. यावर अंदाजे ५ लक्ष रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला. यासोबतच सर्व ९ शाळांमध्ये वाढील खोल्यांचे बांधकाम, शौचालय, खेळासाठी मैदान व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यानंतर योगिता पिपरे यांच्या नेतृत्त्वात शहरातील खुल्या जागांच्या (ओपन स्पेस) सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये ३६ ओपन स्पेसवर संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले. शहरातील प्रत्येक नागरिकाला मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे याकरिता ४६ कोटींच्या निधीतून नवीन पाणीपुरवठा व झोनिंग तयार करण्यात आले. तसेच प्रत्येक नागरिकांच्या घरी असलेल्या नळाला मिटर लावून पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचा नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचा मानस आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना २० वर्षांपूर्वीची असल्याने अनेक ठिकाणी जुनी पाईपलाइन खराब झाली आहे. त्यामुळे नवीन मोटारपंप व जलशुद्धीकरण केंद्रामधील १५० अश्वशक्तीची मोटार व मळपंप तसेच संकूल परिसरातील जलकुंभाला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ३० अश्वशक्तीची मोटारपंप बसविण्यात आली असल्याने पाण्याची समस्या सुटली आहे.
शहरातील शेतकऱ्यांची ३० वर्षांपासूनची पांदण रस्त्यांची समस्या मोठी होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी शहरातील बोरमाळा नदीघाट रस्ता, लांझेडा-खरपुंडी-कठाणी घाट रस्ता, विसापूर येथे पाथरगोटा पांदण रस्ता, फुले वॉर्ड ते कठाणी नदी घाट रस्ता, गोकुळनगर ते आयटीआय बायपास रस्त्याचे बांधकाम २ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आले आहेत.
शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी सरोवर संवर्धन व नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत करण्याबाबत २६ जून २०२० च्या स्थायी समितीमध्ये घेण्यात आलेला असून सर्व तलावांतील अतिक्रमण काढून सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. शहरातील पथदिवे बदलवून नवीन एलईडी लाईट लावण्यात आले असून त्यामुळे शहर प्रकाशमान झाले असून वीजबिलही कमी झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांच्या मागणीमुळे शहरातील विविध ठिकाणी दर्जेदार सिमेंट बेंचेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने संकूल परिसरात रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण व गट्टू लावून फुटपाथ तयार करण्यासाठी नगरोत्थान व दलितेत्तर या योजनेमधून ७ कोटींची कामे करण्यात आली आहेत. कचरामुक्त शहराची संकल्पना साकारण्यासाठी कंपोस्ट डेपोला संरक्षण भिंत, सुमारे १ कोटीच्या निधीतून विलगीकरण प्लान्टची उभारणी करण्यात आली आहे. यासोबतच शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये विद्युत पोल व वीजदिव्यांची सोय करण्यात आली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहरवासीयांचे असेच सहकार्य आवश्यक असल्याचे आवाहन नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles