
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील गोटूल भवनात सोमवार, नऊ ऑगस्टला सकाळी 11 वाजता आंतरराष्ट्रीय मूलनिवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य सैनूजी गोटा यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पुरसलगोंदी ग्रामपंचायतच्या सरपंच अरुणा सडमेक, तर प्रमुख अतिथी म्हणून एटापल्ली पंचायत समितीच्या सदस्य शीला गोटा, पुरसलगोंदी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश कवडो, कन्ना गोटा, कल्पना आलाम, मंगेश नरोटी, दिलीप मटामी, सैनू हिचामी, लक्ष्मण नवडी, पट्टू पोटावी, बाबुराव पुंगाटी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात सकाळी 11 वाजता ध्वजारोहण व ध्वजवंदन, दुपारी 12 वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन व दुपारी 2 वाजता समारोपीय कार्यक्रम होणार आहे.