असा कसा हिंगणा तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार

असा कसा हिंगणा तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*महादेवा करीता हिंगणा तहसील मध्ये २०२३ वर्ष शासकीय कार्य करण्या करिता सुरू*

हिंगणा: देवाचा देव म्हटले तर महादेवाचे नाव पुढे येतात असाच एक महादेव हिंगणा तहसील कार्यालयात मागील काही वर्षां पासून नायब तहसीलदार पदावर कार्य करीत आहेत.व अनेकांना न्याय देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहेत.महसूल विभागात खसरा नंबर , शेताची आराजी ही अंकात असतात त्यामुळे या मध्ये कोणतीही चूक झाली की शेतकऱ्याला तहसील कार्यालय , उपविभागीय कार्यालय , न्यायालय मध्ये चकरा माराव्या लागतात.

ही चूक करणारे अधिकारी शासन यांना चांगला गलगट्ट पगार देऊन ठेवतात त्याच बरोबर यांच्या कडून शेतकरी वर्गा कडून मोठ्या प्रमाणात चिरीमिरी घेतल्या जातात जे चिरीमिरी देऊ शकत नाही त्यांच्या कामात कुठे-ना कुठे काही टंकलिखित चुका यांच्या कडून केल्या जातात असाच एक प्रकार नुकताच खैरी पन्नासे येथील प्रमोद पन्नासे यांच्या बाबतीत घडला आहे.मागील काही वर्षां पासून आपल्या गावातील शासकीय जमीन भू-माफिया ने हडपण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे त्याची माहीती प्रशासनाला देण्याचा प्रयत्न त्यांच्या कडून केला जात आहे.

त्या करीता त्यांना तहसील कार्यालय हिंगणा येथे हेलपाट्या माराव्या लागत आहे.त्या करीता त्यांना माहिती अधिकार कायद्याचा वापर सुद्धा करावा लागत आहे. असाच एक अर्ज त्यांनी दि.२३/०४/२०२२ ला जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार महादेव दराडे यांच्याकडे केला त्या बाबत त्यांना तीन पानांची नुकतीच माहिती देण्यात आली त्या सोबत एक कवेरिंग लेटर देण्यात आले आहे.त्याचा क्र.क.क.ली / ज.मा.अ./तह.ही. कावी 328 /2022 तहसीलदार हिंगणा यांचे कार्यालय हिंगणा दिनांक 20 /05 /2023 असून त्यावर जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार हिंगणा महादेव दराडे यांची सही आहे.याचाच अर्थ असा होतो की भारतात सर्वच कार्यालयात २०२२ वर्ष सुरू असताना हिंगणा तहसील कार्यालयात २०२३ वर्ष कसे सुरू झाले असेल.हा प्रकार केवळ अर्जदाराला नाहक त्रास देण्यासाठी नायब तहसीलदार महादेव दराडे यांनी केला असावा त्यांनी अशाच प्रकारचा त्रास तालुक्यात आमगाव देवळी,पेंढरी देवळी , कान्होलिबारा येथील शेतकऱ्यांना दिला आहे असा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे. त्याच प्रकारे या बाबीची व इतर विषयाची तक्रार तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या कडे केली तरी काहीही उपयोग होताना दिसत नाही.

तालुक्यात भू-माफिया चा सुळसुळाट तर झालाच आहे पण काही शासकीय दरोडेखोर अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांना लुटताना दिसत आहे.तरी या बाबीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांना लक्ष द्यायला वेळ नाही आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles