
डुकरांनी केले वानाडोंगरीकरांना हैरान
✍️पल्लवी पाटील
हिंगणा: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुकांतर्गत वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील खंगार ले-आउट मध्ये डुक्कराचा सुळ-सुळाट झाला आहे. वानाडोंगरीकरांना या डुकरांनी परेशान करून सोडले आहे.
या परिसरात कोणत्याही शासकीय कार्यालया कडून कोणतीही परवानगी न घेतलेल्या बेकायदेशीर खानावळ सुरू आहे. खानावळ मधील अन्न रस्त्यावर फेकत असल्यामुळे डुक्कर ताव मारण्या करीता अनेक तासा पासून प्रतीक्षेत असतात.त्याच बरोबर यामुळे परिसरात दुर्गंधी सुद्धा चालतात या ठिकाण वरून जाताना नाक दाबून जावे लागते. या बाबत परिसरातील नागरिकांनी वानाडोंगरी नगर परिषद प्रशासनाला तक्रारी सादर केल्या आहेत.
जशा इतर तक्रारी पुंगली करून दाबून ठेवल्या तशा येथील तक्रारी सुद्धा दाबून ठेवल्या आहेत.डुक्कराच्या वाढत्या संख्येमुळे कुणाला डुक्कराने चावा घेतल्यास नगर परिषद च्या आरोग्य विभागातच उपचारासाठी येथील रुग्णाला घेऊन जाण्यात येईल व त्या बाबत पोलीस प्रशासना कडे आरोग्य विभागाची व नगर परिषद आरोग्य सभापतीची तक्रार करण्यात येईल अशी चर्चा परिसरातील नागरिक करीत आहे.