वनविभागाच्या जागेतील मुरूम गेलाय चोरीला..!

वनविभागाच्या जागेतील मुरम गेलाय चोरीला…!!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_काल तर इथंच होता, आज मुरूम गायब_

✍️खेमराज गि-हेपुंजे/बिनधास्त

भंडारा: जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील परिसरात वाळूचोरी ही नित्याची बाब झाली असतांना, आता भुरट्या चोरट्यांनी आपला मोर्चा मुरूम चोरीकडे वळविला आहे . कवडसी गावाच्या हद्दीतील वनविभागाच्या जागेतून खुलेआम मुरमाचा उपसा करून अवैध वाहतूक करण्यात येत आहे. नित्यनेमाने ये जा करणा-यांना प्रश्न पडलाय की, ‘मुरूम चोरीला गेला कसा, काल तर इथच होता.’ त्यामुळे महसूल विभागाकडून पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे . कवडसी गावाच्या शेजारी असलेल्या भूमापन क्रमांक १०२ या शासकीय जागेतून ४२४ ब्रास मुरूम उपसा करण्यात आला आहे .

ही जागा कुरणाची असून येथे पाळीव जनावरे चाराईसाठी जातात . मात्र , खोदकामामुळे झालेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे जनावरे त्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे . परिसरात गौण खनिज चोरी प्रकरणामध्ये वाढ झाली आहे . या संबंधी महसूल विभागाने अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे . रस्ता रुंदीकरणाच्या कामात वापर शासकीय जागेतून काढलेला मुरूम जवळ सुरू असलेल्या मचारणा ते निमगाव मार्गाच्या बांधकामात वापरले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते त्या आधारावर पाहणी करूत तलाठी एम . जे कासराडे यांनी याचा पंचनाम्यात उल्लेख केला आहे त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या कामात अवैध मुरूम वापरला हे स्पष्ट झाले आहे . संबंधित कंत्रादारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक व पशुपालकांनी केली आहे.

” ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मौका पाहणी केली . यामध्ये शासकीय जागेत मुरूम उत्खनन केले असून त्याचा अवैध्यरित्या रस्त्याच्या कामात वापर केल्याचे दिसून आले . हा पाहणी अहवाल तहसीलदारांना पाठविला आहे.

*एम जी कासराडे , तलाठी कवलेवाडा*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles