विदर्भात भाजपाचे ” कुणबी – मराठा कार्ड”

▪️राजरंग▪️
*विदर्भात भाजपचे ‘कुणबी-मराठा कार्ड’*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर . भाजपने सहा वर्षांपुर्वी डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेवर पाठवून जातीय समीकरणांची खेळी केली होती. आता डॉ. बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन कुणबी-मराठा समाजामध्ये जनाधार मजबूत करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपने राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत ‘कुणबी-मराठा’ कार्ड खेळत व्यूहरचना केली आहे.
६२ वर्षीय भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या डॉ. अनिल बोंडे यांनी फडणवीस सरकारच्या काळात कृषिमंत्रीपदही भुषवले आहे. अनिल बोंडे २००९ ते २०१४ या काळात ते मोर्शी मतदार सघांचे अपक्ष आमदार होते. २०१४ मध्ये भाजपात प्रवेश करत विधानसभाही गाठली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर स्वस्थ न बसता, डॉ. बोंडे यांनी भाजपच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर टीकास्त्र सोडले. त्यांची काही वक्तव्ये वादग्रस्त देखील ठरली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटचे मानले जातात.
कुणबी-मराठा समाज दूर गेल्याने अमरावती जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांना फटका बसल्याचा निष्कर्ष भाजपच्या ‘चिंतना’तून काढण्यात आला. त्यामुळे जातीय-धार्मिक धृवीकरणातून मतपेटी मजबूत करण्याचे धोरण भाजपने आखल्याचे दिसून आले आहे. डॉ. अनिल बोंडे हे कुणबी (मराठा) समाजाचे आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपने इतर ठिकाणी चांगली कामगिरी केली असताना अमरावती जिल्ह्यात मात्र एकाच जागेवर समाधान मानावे लागले, याचे शल्य अजूनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमरावतीतील विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील कुणबी-मराठा समुदायाकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेशी कडवी लढत द्यावी लागणार असल्याने आतापासूनच कुणबी-मराठा कार्डचा वापर करण्याची रणनीती भाजपने आखल्याचे चित्र आहे.

*राज्यसभा निवडणुकीतील आकड्यांचं गणित?*

सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदारांचं वजन भाजपकडे आहे.

राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मतांचा कोटा किती असावा, यासाठीचं एक सूत्र आहे.
यानुसार राज्यातील एकूण विधानसभा सदस्यांची संख्या भागिले (÷) राज्यसभेच्या रिक्त जागा +१ = आलेली संख्या + १ = संबंधित आलेली संख्या …….. हा विजयी उमेदवारांचा निकष

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles