बेरोजगारीचा शाप… “पीठमांग्या”

*बेरोजगारीचा शाप…’ पीठमांग्या ‘*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लाखनी.
“सळसळणाऱ्या हातांना,
दिल्या कामाऐवजी नांग्या,
मजबूर ऐसे केले की,
बना लागलं पीठमांग्या..”
वैदर्भीय भाषेचा गोडवा अधिकाधिक प्रगल्भित करणा-या मराठी साहित्यक्षेत्रातील कवी कवयित्रींनी ‘पीठमांग्या’ या प्रादेशिक ठिकाणी वापरल्या जाणा-या शब्दाला ‘रिकामटेकडा’ या समानार्थी शब्दलंकाराने सजविण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न म्हणजेच मराठी भाषेची श्रीमंती होय. मराठीचे संवर्धन व सक्षमीकरण करीत असलेल्या सोशल मिडीयावरील मराठीचे शिलेदार या व्हाट्स एप समूहाच्या प्रशंसनीय उपक्रमाने मराठीतील वैदर्भीय झाडीपट्टी व व-हाडी भाषेतील गोडवा अजूनही टिकून आहे.

काय करू भाऊ?..मला ना नोकरी ना स्वतःचा धंदा..कुठं काही जमच नाही ना बसत..खूप शिकलो..शिकलो तेव्हा वाटायचं..आपल्यापेक्षा कुणीच नसेल पुढे..पण नोकरीच्या बाजारात जेव्हा पाऊल ठेवले तेव्हा जीवघेण्या स्पर्धेची जाणीव झाली..माझ्या या बेरोजगारीला आणि रिकामटेकडेपणाला हसणारा हा चावडीवरचा मित्रमंडळीचा कट्टा मला ‘पीठमांग्या’ म्हणतात..” कुठं चाल्लास बे पीठमांग्या?” असे मागून बिरुद लावून बोंबाही मारतात..! अरे हो आहे मी रिकामटेकडा..यात माझा काय दोष?..

आमचे घरचे पण लयीच धांदरट..खूप घाई केली लग्नाची..आधी स्वतःचं पोट भरायची मारामारी त्यात गळ्यात बायकोरूपी लोंडणं दिलं बांधून..दुष्काळात तेरावा महिना…’बेरोजगारीचा शापच’. मित्र तर मित्र हल्ली बायको पण ‘पीठमांग्या’ म्हणून हेळसांड करू लागली. चालायचचं..आपलेच दात अन् आपलेच ओठ…

काय मंडळी..कधी विदर्भात फिरलात काय?…सध्या तर जावूच नका..खूप तापलाय सूर्य तिकडे..सध्या आग ओकतोय म्हणे..! तुम्हांला नविन वाटत असलेला हा ‘पीठमांग्या’ शब्द खास वैदर्भीय भाषेतला… विशेषतः रिकामटेकड्या लोकांसाठी शालजोडा म्हणून वापरात येणारा..हा शब्द खरं तर आपल्या प्रतिष्ठेचा पार कचरा करून टाकतो राव…पण काय करणार..आलिया भोगासी असावे सादर…

“नाही रोजगार शिल्लक,
नाही हो मोल मजूरी,
फिरून फिरून संपली,
जवानी पुरीच्या पुरी…”
खरं तर वैदर्भीय भाषेत गोडवा अगदी काकवीसारखा आहे.,अन् अनेक साहित्यिकांनी शब्दरूपी अलंकारानं ही भाषा छान सजवलीय..शब्दांची खाण असलेल्या या वैदर्भीय मातीत अनेक साहित्यिकांची मांदियाळी पहावयास मिळते..अशा साहित्यिकांसाठी आज ‘पीठमांग्या’ सारख्या आगळ्यावेगळ्या शब्दाला कवीकल्पनेत घेरायचं धाडस केलं ते मराठीच्या वैदभीय जाणकारांनी. यात प्रामुख्याने उल्लेख करायचा तर सोशील मिडियात अग्रेसर असलेल्या मराठीचे शिलेदार या व्हाॕटसअप समुहाचा.

सदा न् कदा कोपऱ्यावर उभा,
वाट पहात सावजाची,
वेळ घालवाया शोधे संधी,
सवय न जाई पीठमांग्याची

अशा चारोळ्यांनी ग्रामीण भागातला पीठमांग्या अधोरेखित केला गेला..काही कवीकवयित्रींनी नियतीवर रूसलेला ‘पीठमांग्या’ रचला तर काहींना त्यात फकीर दिसला..काहींना ‘पीठमांग्या’ चे विचार अनुभवी वाटले तर काहींनी त्याला साहेबाचा बाप बनवले….कुठे बापाला ‘पीठमांग्या’ म्हणून हिणवले गेले तर कुठे त्याला ऐतखाऊचे बिरूद लावले गेले…असो.. अपेक्षित असलेला ‘पीठमांग्या’ सजवण्यात आपण निश्चितच यशस्वी झालोत तेव्हा वैदभीय शब्दाला मराठीच्या जाणकारांनी मनापासून आपल्या लेखणीतून सजविले आहे. विदर्भाशिवाय मराठवाडा, प. महाराष्ट्र, खान्देश इथल्याही कवी कवयीत्रींनी या शब्दाचे समर्थन केले असून यावर दर्जेदार कविता रचल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles