फरार सरपंच अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच !

शिरूर : खोटी कागदपत्रे आणि शिक्के वापरून तो लोकांची फसवणूक करायचा. ज्यांची फसवणूक झाली त्यांनी त्याच्याविषयी पोलिसात तक्रारी केल्या होत्या. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत त्याच्यावर गुन्हे दाखल केले. मात्र, गुन्हे दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सहा कोटींचा गंडा घालून फरार झालेला कथित ‘तो’ दुसरा तिसरा कुणी नसून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आलेगाव पागाचा सरपंच अप्पा सीताराम बेनके आहे. हा फरार सरपंच गावात येणार असल्याची खबर शिरूर पोलिसांना मिळताच त्याचा पाठलाग करून त्याला गजाआड करण्यात आले.
सरपंच अप्पा बेनके याने रामचंद्र बेनके, सीताराम बेनके व बापूसाहेब बेनके यांच्या शेतजमिनीवर सहा कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. या कर्जासाठी गावातील तलाठी इंगळे यांच्या नावाचे खोटे शिक्के तयार करून, सातबारा उताऱ्यावर खोट्या सह्या करून ७/१२ उताऱ्याच्या सहायाने कर्ज बोजा नोंद त्याची खोटी नोट तयार करून कर्जाची उचल केली होती. त्याबाबत पोलिस ठाण्यात २०१८ ते २०२१ या दरम्यान फसवणूक केल्याबद्दल रितसर तक्रार दिल्या गेली होती. मात्र, त्यानंतर तो फरार झाला होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles