
सेनेच्या संजय पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा
_पक्षाचे अतिरिक्त मते देण्याचे आदेश_
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. या बैठीकीत शरद पवार यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar)यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक असलेली ११ मते शिवसेनेच्या संजय पवार यांना द्या, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत (Shivsena)१४ महापालिका निवडणुकीतील आघाडी सदर्भात चर्चा करावी, अशा सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या आहेत.
राज्यातील १४ महापालिका निवडणुकांसंदर्भात आघाडी करण्यासाठी चर्चा करा. काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा करा. मुंबई महापालिकेसाठी विभागवार बैठका घ्या. मंत्र्यांनी महापालिका निवडणुका असलेल्या ठिकाणी जनता दरबार घ्यावेत, अशा सूचना देखील शरद पवार यांनी दिल्या आहेत दरम्यान, राष्ट्रवादीची अतिरिक्त मते शिवसेनेलाच देणार असल्याचे अजित पवार यांनी काल सकाळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
मागच्या राज्यसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी शिवसेनेला शब्द दिला होता की, शिवसेनेचा उमेदवार निवडूण आणण्यासाठी होऊ ती मते त्यांच्याकडेही आणि आपल्याकडेही नाही, त्यामुळे यावेळी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आणि पुढच्यावेळी आम्ही तुम्हाला देतो, त्या शब्दानुसार यावेळी आमची जी अधिकची मते आहेत ती आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला देणार आहोत, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले होते. मागे झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शरद पवार आणि फौजिया खान हे बिनविरोध विजयी झाले होते.