कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार?

कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरू आहे. आज गुरूवारी कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल 10 डॉलरने घसरले होते. मात्र आज पुन्हा एकदा कच्चा तेलाच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल 117 डॉलरच्या वर पोहोचले आहेत.

दरम्यान, कच्चा तेलाच्या दरात वाढ झाल्यानंतर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. शुक्रवारी सकाळी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. जाहीर केलेल्या नवीन दरानुसार, मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये लिटर आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर दिल्लीत दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 96.72 आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाची किंमत प्रति बॅरल 117 डॉलरच्या दिशेने जात आहे.

रशियन तेल खरेदी बंद झाल्यामुळे पुरवठा खंडित झाला असताना हा प्रकार घडला आहे. त्याची भरपाई करण्यासाठी ओपेकने उत्पादन वाढवण्याचे आश्वासन दिले असले, तरी सध्या जागतिक स्तरावर पुरवठ्यावर संकट आहे. शुक्रवारी सकाळी कच्चा तेलाचे भाव दर प्रति बॅरल 117 डॉलरवर पोहचले आहे. मात्र आज त्यात वाढ होवूनही पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर कायम आहेत. 4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई – मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली – दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई – चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता – कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles