विश्वाच्या सजीव साम्राज्यातील ‘वसुंधरा’

विश्वाच्या सजीव साम्राज्यातील ‘वसुंधरा’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️अनिता व्यवहारे, अहमदनगर

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,” संत तुकाराम महाराज यांच्या या ओळी चिरंतन सार्थ ठरणाऱ्या… पण आपण त्या मनावर न कोरता फक्त कागदावर ठेवल्यात….. आणि त्यामुळेचं आज माणसाचं जीवन मेटाकुटीला आलय…. वृक्ष तोड, जंगलतोड, वन्य जीवांची हत्या…. हे सगळं सर्रास पणे चालूच आहे.. पूर्वीच्या काळी आपली ही पृथ्वीमाता… हो हो.. वसुंधरा सुजलाम सुफलाम सस्यश्यामल होती. तिचं स्वरूप अफाट आणि मनोवेधक… उंच उंच पर्वत शिखरांनी नटलेलं.. इवल्या इवल्या गवताच्या पात्यापासून ताडामाडाच्या च्या वृक्षराजीने बहरलेल घनदाट जंगल.. अव्याहत पणे वाहणारे प्रचंड जलाशय.. दऱ्याखोऱ्यांनी, डोंगर कपारींनी सजलेलं असं तिचं रूप.. वसुंधरा म्हणजे विश्वाच्या विशाल साम्राज्यात सजीव सृष्टी धारण करणारा एकमेव घटक.

आपले पूर्वज तिला देवता मानीत. उदार अंतःकरण असलेली ही वसुंधरा…! जीवसृष्टीच्या भरण-पोषणासाठी ती अनंत हस्ते भरभरून देते. पण अशा या उदार अंतकरणाच्या माते ची आपण काय कदर केली आपण तिचं वातावरण दूषित केलं. तिच्या पर्यावरणाला बाधा आणली. तिच नैसर्गिक स्वरूप आपल्या दुष्कृत्यांनी आपण कुरूप करून टाकलं.. पण याचा परिणाम आज आपल्याला भोगावा लागत आहे.

अखिल जीवसृष्टीच्या कल्याणासाठी, भावी जीवनाच्या गतिमान विकासासाठी व पर्यावरणाच्या संवर्धनाची आज नितांत गरज आहे. आणि हे जर आपण साध्य करू शकलो तर नक्कीच आपली वसुंधरा स्वर्गाहूनही रमणीय असेल. उन्हाने तप्त झालेल्या वसुंधरेला भिजताना काय सुख वाटत असेल..!पावसाचा पहिला थेंब चोचीत पकडताना सागरातल्या शिंपल्यांचा जो आनंद… तोच ती अनुभवत असेलं.. हे सारे आपण अनुभवलेले असेल.. वसुंधरेन पहिला पाऊस अंगावर घेताना…!!

कालांतराने… हा पाऊस थांबतो. पण तिच्या मनावर सातत्याने कोसळणाऱ्या प्रदूषणाच्या पावसाचं काय? तो तर सतत कोसळतोच आहे.. म्हणून म्हणावसं वाटतं, ‘अशी वसुंधरा भिजली ओलीचिंब झाली पावसाच्या एका सरीला चातकावानी आसुसली.” आणि आज ही परिस्थिती अजून बिकट होतं चालली. झाडें कमी, पाऊस कमी… परिणाम काय… तर दुष्काळ…… “वृक्ष तोड…” आपल्या हातून घडणार हे महापाप. जशी आपल्यातील काहीच जणांना ही खंत वाटते… तसे वसुंधरेचा मानसपुत्र वृक्ष याला ही अशी खंत वाटते…की त्याने आपल्याला सुख, समाधान, शांती, सावली दिली.. महापुरुषांना साक्षात्कारही या छायेत त्याच्या छायेत झाला.

आपल्या अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण करत पर्यावरणाचं संतुलन राखलं…. त्याच्यावरच आज आपण घाव घालत आहोत. कुठे गेली आपल्यातली ती वृत्ती.. “देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे” शतकानुशतके आपण भरभरून घेत आलो आहोत…

म्हणूनचं आज म्हणावसं वाटतंय, ‘लावा वृक्ष… मिळवा मोक्ष! अन्यथा माणसाचे आयुष्य धोक्यात आली येईल.. आणि मग.. झोपेल अजून माळ तापवित काया. असंख्य नद्या अजून वाहतात वाया अजूनही अपार दुःख वाट पाहता हे | अजून हा प्रचंड देश भीक मागत आहे || तेव्हा उठा भूमी पुत्रांनो व्हा सज्ज.. जोपासा या वसुंधरेला… वाढवा तिच्या सौन्दर्याला.. हिरव्या हिरव्या गार गालिचे यांनी नटवा तिला आणि मग म्हणा ‘वसुंधरा माझी सखी सोबती अनंत उपकार तिचे आमच्यावरती आणि करा साजरा आजचा ‘पर्यावरण दिन…’!

🙏पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांना शुभेच्छा.🙏

सौ अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles