वानाडोंगरीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा असाही ‘प्रताप’

वानाडोंगरीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा असाही ‘प्रताप’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_फुलझेले कुटुंबास चार दिवस पाणी न देण्याचा नगरसेवकाचा पवित्रा_

प्रतिनिधी गजानन ढाकुलकर

नागपूर/ हिंगणा : तालुक्यातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र.६ मधील रहिवाशी सेवानिवृत्त कर्मचारी वसंतराव फुलझेले यांच्या घरासमोरून पाणी टँकर जात असताना त्यांच्या पत्नीने टँकर चालकाला थांबवून पाणी मागितले असता टँकर चालकाने पाणी देण्यास नकार दिला व सांगितले, की वसंतराव फुलझेले यांना टँकरने पाणी देऊ नये.

ही बाब त्यांनी आपल्या पतीना सांगितली असता फुलझेले यांनी नगरसेवक प्रशांत सोमकुवर यांचेशी संपर्क साधला. तर त्यांनी सांगितले की आपणाकडे कालच टँकर द्वारे दहा ड्रम पाणी दिले. यावर फुलझेले यांनी सांगितले की, माझ्याकडे एकही ड्रम नसल्यामुळे मी कालच एक नवा ड्रम विकत आणला व एक जुना ड्रम असताना आपण मला दहा ड्रम पाणी दिलेच कधी?

आपण माझ्या घराच्या आजू बाजूला सर्वांना पाणी देत आहात. परंतुमाझ्या बाबतीतच आपली अशी वागणूक का? असा सवालही त्यांनी सोमकुवर यांना केला असता, यावर नगरसेवक आणखीनच त्यांच्यावर गरम झाले.

आपल्या कुटुंबास आजपासून चार दिवस मुळीच पाणी मिळणार नाही असा पवित्राच त्यांनी घेतला. याबाबत फुलझेले यांचे मन सुन्न झाले. त्यांनी प्रतिनिधीस सांगितले, की आताच नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेला, आम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा नगरसेवक प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांशी असा वागतो. तर पूर्ण कालावधीसाठी निवडून आला असता तर कसा वागला असता? याबाबत त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांचेशी संपर्क साधला त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तरी नगरसेवकाच्या अशा वागणुकीने सेवानिवृत्त कर्मचारी फुलझेले यांचे मन दुखावले गेले हे निश्चित.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles