सोमलवाडा सोसायटीची बिनविरोध निवड
लाखनी: विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. सोमलवाडाची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये तेजराम भिवगडे, राजेश (बबलुभाऊ) निंबेकर, धनंजयभाऊ तिरपुडे, हेमंत अतकारी, दिपक निंबेकर, सुहास टिचकुले, संजय अतकारी, संजय टिचकुले, शरद निर्वाण, निरज चाचेरे, रामरतन क्षिरसागर, पुष्पाताई गिऱ्हेपुंजे, कल्पनाताई भिवगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर बिनविरोध निवडणुकीची प्रकिया ही बबलुभाऊ निंबेकर यांच्या प्रयत्नाने पार पडली.