
भाजप- सेनेसह सहा पक्षप्रमुखांना समन्स
_’त्या’ प्रकरणामुळे चर्चेला उधाण_
मुंबई: बहुचर्चित पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या कोरेगाव भीमा आयोगाने शिवसेना , भाजपसह सहा पक्षांच्या प्रमुखांना समन्स बजावले असल्याचे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते.
प्रत्यक्षात या सहा पक्षांच्या प्रमुखांना समन्स बजावण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारा अर्ज आयोगासमोर दाखल करण्यात आला होता. आयोगाच्या अध्यक्षांसमोर दाखल केलेल्या अर्जात शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (ए) आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर हा अर्ज स्वीकारण्यात आला असून समन्स बजावण्यात आले आहेत.
या प्रकरणात, हे लोक स्वतः आयोगासमोर हजर राहू शकतात किंवा त्यांचे प्रतिनिधी हजर राहू शकतात. आयोगासमोर त्यांचे म्हणणेही नोंदवावे लागेल. 30 जूनपूर्वी कार्यालयात प्रतिज्ञापत्रही दाखल करावे, असे आयोगाने म्हटले आहे. या आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा चौकशी योगापूर्वी प्रतिज्ञापत्र दिले होते. ज्यात त्यांनी म्हटले होते की, जानेवारी 2018 मध्ये पुणे जिल्ह्यातील युद्धस्मारकावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी कोणत्याही राजकीय अजेंड्यावर माझ्यावर कोणतेही आरोप नाहीत. 11 एप्रिल रोजी पवार यांनी चौकशी आयोगासमोर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. तर 8 ऑक्टोबर 2018 रोजी प्रतिज्ञापत्रही दिले होते.