
‘सभेचे राज्य’
डोळे हे जुल्मी गडे रोखून मज पाहती..
एकाहून एक ऊंची हॉटेलमध्ये डांबती
तिकडे नव्हे..इकडे यावे,मज सांगती
“बहुमोल” माझा मताधिकार जाणती
“ते” एकाहून एक थोर नेते बाहुबली
बोलती माझी त्यांच्यापुढे बंद झाली..
‘त्यांच्या’ कुवतीनुसार ‘मोल’ माझे लावती
बाजारात उभा घोड्यासम मज समजती
स्वाभिमान माझा हरवला आहे जणू…
मत स्वातंत्र्य माझे मीच कसे,काय वाणू?
सत्तेचा खेळ क्रूर सारा मांडला भोवती…
किती,कुणा स्वातंत्र्य प्रश्न मज पडती…
ही अशी माझ्या सत्वाची कठीण परीक्षा
झालो लोकप्रतिनिधी भोगतो रोज शिक्षा
दगडाखाली आडकले हात सांगू कोणा ते ?
“राज्य” हे ‘सभेचे’ मज हवे,पण..नकोसे वाटते!
✍️अमृता खाकुर्डीकर, पुणे