मुंबईत 3 मजली इमारत कोसळून 1 ठार 18 जण जखमी

मुंबईत 3 मजली इमारत कोसळून 1 ठार 18 जण जखमी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील शास्त्री नगर मध्ये बुधवारी मध्यरात्री तीन मजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जण जखमी झाले आहेत तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर नजीकच्या भाभा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येऊन त्यापैकी १७ डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शास्त्री नगर मधील झोपडपट्टीत बुधवारी मध्यरात्री रात्री १२.२० वाजताच्या सुमारास सर्वजण झोपलेले असताना तीन मजली लोखंडी पत्र्याचे घर अचानक कोसळले आणि एकच हाहाकार उडाला. पत्र्याचे घर असल्याने प्रचंड आवाज झाला. परिसरातील नागरिक दुर्घटनेच्या ठिकाणी पोहचून बचावकार्य सुरू केले.अग्निशामक दलाने युद्धपातळीवर केलेल्या बचावकार्यामुळे १९ जणांना तात्काळ बाहेर काढण्यात यश आले.

काळबादेवी येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू

जखमींपैकी शाहनवाज (वय ५५) या व्यक्तीचा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर उर्वरित १८ जखमींवर भाभा व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमींमध्ये २ अल्पवयीन मुले, ३ जेष्ठ नागरिक व तरुण मुले यांचा समावेश आहे. घटनास्थळी मध्यरात्री उशिरापर्यंत कोसळलेल्या घराचा ढिगारा उचलण्याचे काम सुरू होते. दरम्यान, ही दुर्घटना का व कशी काय घडली याबाबत पोलीस व अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.

मृत्यू -: शाहनवाज आलम (वय 55)

जखमींची माहिती -:
(१) जुल्फिगार शेख (वय ३२)
(२) महंमद शबीर शेख (वय ४०)
(३) शमीफुल हक (वय ३६)
(४) महमद शातो रब (वय ३३)
(५) नूर आलम शेख (वय २३)
(६) शमी अहमद शेख (वय ४०)
(७) अली अहमद शेख (वय ६५)
(८) सलीम उस्मान शेख (वय १६)
(९)महमद अल्फाज शेख (वय ६३)
(१०) महमद नर सलाम शेख (वय ६६)
(११) महंमद जानी फेल (वय ३६)
(१२) महमद एहेसान आलम (वय३२)
(१३) महमद फैजान शेख (वय १३)
(१४) महमद मन्वार आलम (वय ३६)
(१५) मंगल आलम शहाबुद्दीन शेख (वय ४६)
(१६) जसीरुद्दीन शेख (वय ५०)
(१७)रशीद (वय ३५)
(१८) महंमद जहांगीर शेख (वय ४६)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles