वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या सामन्यांचे फक्त डीडी स्पोर्टर्सवर थेट प्रसारण
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. एकदिवसीय तीन सामने तर टी ट्वेन्टीचे पाच सामने हे दोन संघ खेळणार आहेत. या दोन संघात होणाऱ्या या सर्व क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण केवळ डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येईल. डीडी स्पोर्ट्स जुलैच्या दौऱ्यातील सर्व भारत-वेस्ट इंडिज सामने डीडी फ्री डिश व्यतिरिक्त सर्व केबल आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर प्रसारित करेल.
भारताचा वेस्ट इंडिज दौरा 22 जुलै ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत असणार आहे. क्रिकेट सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाशिवाय तज्ज्ञ आणि क्रिकेट मान्यवरांशी सामनापूर्व आणि सामन्यानंतरच्या विश्लेषणावर आधारित विशेष कार्यक्रमदेखील डीडी स्पोर्ट्स प्रसारित करेल. ही क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट ठरेल.