
‘व्यसनमुक्ती जनजागृती बाईक रॅली’चे २६ जून रोजी भव्य आयोजन
नागपूर: जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्य रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्रा, लेडीज अँड जेंट्स च्यावतीने व्यसनमुक्ती जनजागृती कृती समिती द्वारा
२६ जून २०२२ ला दुपारी २ वाजता पासून भव्य व्यसनमुक्ती जनजागृती बाईक रॅलीचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याचे संचालिका प्रांजली वांढरे ताल्हन, सचिव सुरेश वांढरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पत्रपरिषदेत माहिती दिली. यावेळी निर्मला मानमोडे, अरुणा भोंडे, सविता तायवाडे, नंदा देशमुख, अनिता ठेंगरे, वृंदा ठाकरे, राजेश ठाकरे, आणि अनंत घुलक्षे उपस्थित होते.
समाजात व्यसन या समस्येबद्दल जनजागृती व्हावी आपला समाज व्यसनांपासून दूर राहावा हा मुख्य उद्देश आहे. ही रॅली अण्णा भाऊ साठे चौक (दिक्षाभूमी) ते संविधान चौकापर्यंत राहील. तसेच रॅलीचा मार्ग ‘अण्णा भाऊ साठे चौक (दिक्षाभूमी) पासून सुरू होणार, अंबाझरी रोड वरून लोकमत चौक, झाशी राणी चौक, व्हरायटी चौक, झिरो माईल पासून संविधान चौक पर्यंत राहणार. यात ढोल ताशा पथक द्वारा जल्लोषात सुरवात केली जाईल. त्यानंतर पथनाट्य सादर होईल. नंतर ही बाईक रॅलीची सुरवात, आणि रॅली जिथे संपेल तिथे पुन्हा एकदा पथनाट्य सादर केल्या जाईल. असे नियोजन आहे.
या जनजागृती बाईक रॅलीचे विशेष म्हणजे २६ जून हे ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस’ असल्यामुळे या दिवशी संपूर्ण जगात विविध व्यसनमुक्ती जनजागृतीचे कार्यक्रम घेऊन साजरा केला जात असतो. या दिवसाचे औचित्य साधून नागपूरमध्ये पहिल्यांदाच अश्या प्रकारची व्यसनमुक्ती जनजागृती साठी बाईक रॅली निघत आहे. रिफ्रेश व्यसनमुक्ती केन्द्र, (लेडीज अँड जेंटस) हे विदर्भातील एक आघाडीचे व्यसनमुक्ती उपचार केंद्र आहे, जेथे पुरुषाबरोबरच महिलांच्या व्यसनमुक्ती साठी गेल्या पाच वर्षापासून सातत्याने यशस्वी उपचार सुरु आहे. या बाईक रॅलीत विविध क्षेत्रातील मान्यवर, रिफ्रेश व्यसनमुक्ती जनजागृती कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच बहुसंख्य समाजातील लोकांचा समावेश रहाणार आहे.