दुहेरी हत्याकांडातील आरोपी पोलीसांच्या ताब्यात

दुहेरी हत्याकांडातील आरोपी पोलीसांच्या ताब्यातपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन नागपूर अंतर्गत येत असलेल्या अमर नगर निलडोह ग्रामपंचायत परिसरात दोघांची हत्या तर २ गंभीर जखमी. जखमींवर लता मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

दिनांक 26-06-2022 रोजी 00.30 वा. च्या सुमारास मयत भगवान रव्हारे यांचे घर वॉर्ड नंबर 2 अमर नगर पो.स्टे. एमआयडीसी येथे हा गुन्हा घडला असून भगवान बाळकृष्ण रव्हारे, वय 75 वर्षे, पुष्पा भगवान रव्हारे वय 65 वर्षे हे दोन्ही राहणार अमर नगर, वॉर्ड नंबर 2 एमआयडीसी पो. स्टे. मयत झालेले आहे. तर कल्पना नरमु यादव वय 35 वर्ष व मुस्कान नरमु यादव वय 16 वर्ष जखमी झाले आहेत. मुख्य आरोपी नरमु सीता यादव वय 42 वर्ष, राहणार-अमर नगर एमआयडीसी. मूळ राहणार – उत्तर प्रदेश, धनसूलागाव, तहसील – सगडी, जिल्हा अझमगड यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार यातील आरोपी हा मयताचा जावई आहे. यातील मयत,जखमी व आरोपी हे सर्वजण एकाच घरात राहतात. यातील आरोपीचे डोके दुखत असल्याने त्यांनी त्याची पत्नी कल्पना हिला डोके दाबून देण्यास सांगितले असता पत्नीने नकार देऊन त्यास ढकलून दिले. याचा राग आरोपीला आल्याने आरोपीने पत्नीला थापड मारली. यातील मयत सासू-सासरे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता भांडण वाढल्याने आरोपीने रागाने वरील सर्वांना कुऱ्हाड आणि दगडाने मारहाण करून सासू-सासर्‍यांना जीवे ठार मारले व पत्नी आणि मुलीला जखमी केले. दोन्ही जखमींवर लता मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचार चालू असून दोन्ही जखमिंची प्रकृती स्थिर आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या गुन्ह्याच्या तपासात नागपूर शहर गुन्हें प्रकटीकरण क्र १चे पोलीस निरिक्षक श्री पतंगे सर, ᴀᴩɪ गुप्ता,api बजबळकर ,api गवई, asi चौरे,hc, अक्षय,hc देशमुख, hc पवार npc हेमंत,npc विलास,npc शरद तसेच चालक भारती व नितिन यांनी कारवाई केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles