शिवसेने तर्फे ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड वाटप
नागपूर: शिवसेना विभाग प्रमुख गजानन चकोले यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आज दि २८ जून रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.
शिवसेना संपर्क प्रमुख दृश्यंत चतुर्वेदी सहसंपर्क प्रमुख मंगेश काशीकर, विदर्भ प्रवक्ता किशोर, कन्हेरे जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे शहर प्रमुख दीपक कापसे, शहर संघटक किशोर पराते यांच्या आदेशाने व यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग प्रमुख गजानन चकोले यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे स्मार्ट कार्ड चे वाटप करतांना शिवसेनाचे उपजिल्हाप्रमुख योगेश गोंन्नाडे, चंद्रशेखर श्रीराव यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना कार्ड वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रामुख्याने कमलाकर, सावरकर, सुनील कांबळे, आकाश मेघरे, रोहित गजभिये, समिहंत चकोले, शिवसैनिक उपस्थित होते.