
बंडखोरांनो तुम्ही पत्करलेला मार्ग हा केवळ अज्ञानापोटी; माजी न्यायाधीश कोळसे पाटील
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि भाज्यपालांच्या ब्राम्ह्यण्यवादी, कपटी, क्रुर चांडाळ चौकडीला बळी पडलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदार बहिणी भावांना, माझा एक महत्वाचा इशारा: बहिणी भावांनो ! तुम्ही जो मार्ग पत्करलाय तो अज्ञानापोटी, एक भयंकर विषाचा प्याला ओठाला लावलेला आहे. यातून तुमचा आणि तुमच्या मतदार संघाचा कांहीही फायदा होणार नाही,हे लक्षांत ठेवा. असे मत माजी न्यायाधीश कोळसे पाटील यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.
जर खरंच तुमचे निदान ३७ आमदाराची संख्या असेल तर येऊन स्पिकरपुढे सिध्द करा वेळ दवडूं नका.पण ते शक्य नसेल तर तुम्ही निवडलेला मार्ग शेवटी कोर्टातूनच सुटणार आहे आणि त्याला किती वेळ लागेल? कुणीही सांगू शकत नाही.तेंव्हा किती दिवस आपलं घरदार,राज्य,मतदार संघ सोडून बाहेर राहाणार ?महत्वाचे म्हणजे संघप्रणित भाजपाचे राज्य फक्त तुमची,गरीबांची आणि देशाची १००% बर्बादीच आहे. तुमच्यापैकी अनेकांनी त्यांची पूर्वी मंत्रीपदं भोगलेली आहेत.
तुमच्यावर २४ तास संघाची नजर असते ना? गरिबांच्या कल्याणाचं कुठलंही काम तुम्ही करूंच शकणार नाही.केवळ तुमच्या वैयक्तिक लोभापोटी तुम्ही शिवसेनेला राज्यांत तोंड देऊं शकाल काय? बाकी आपली मर्जी ! विचार करा.जेवढे जास्त शेअर कराल तेंव्हढं महाराष्ट्राचं आणि मराठी जनतेचं भलं होईल.
ता.क.मी कुणाच्याही बांजूचा किंवा विरोधक नाही. माझ्या सद्सद् विवेक बुध्दीला जे जे पटते ते मी काम करीत असतो.संघ काय आहे ? याची मी चांगलाच जाणकार आहे,आणि माझं सर्वकांही पणाला लावून १९७६ पासून लढत आहे.म्हणून आजचे आघाडी सरकार अस्तित्वात यावे असा प्रयत्न मी २०१४ सालीच माझे परम मित्र बाळासाहेब यांना भेटून केला होता. त्यावेळी काय घडलं? त्याचा ताजा आणि प्रत्यक्ष इतिहासाचे तुम्ही साक्षीदार अहात.