शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहात सिकलसेल तपासणी शिबीर

शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहात सिकलसेल तपासणी शिबीर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर

नागपूर/हिंगणा: – आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे द्वारा महाराष्ट्रातील आदिवासी विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहे यामधील सर्व विद्यार्थ्यांचे सिकलसेल ॲनिमियाच्या स्थितीचे सर्वेक्षण करणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करून कार्ड वाटप करण्याबाबतची योजना संदर्भात आज आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर द्वारा आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह कुकडे ले आऊट क्रं 1 चंद्रमणी नगर येथे सिकलसेल तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात एकुण 36 मुलांची सिकलसेल सोलुबिलीटी तपासणी केली यामध्ये 2 विद्यार्थी सिकलसेल सोलुबिलीटी पॉझिटिव्ह आढळले. तसेच आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह कुकडे ले आऊट क्रं 2 चंद्रमणी नगर येथे सिकलसेल तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात एकुण 17 मुलांची सिकलसेल सोलुबिलीटी तपासणी केली यामध्ये 4 विद्यार्थी सिकलसेल सोलुबिलीटी पॉझिटिव्ह आढळले. या शिबिरात सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे यांनी सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या या योजनेद्वारा नागपूर व नाशिक विभागाअंतर्गत सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे रोगनीदान झाल्यावर कार्ड वाटप करण्यात येतील. शिबिर यशस्वीकरीता सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे, पायल देवगडे, पुनम आत्राम, सुर्या जांभेकर, मनिषा सोलकर, अनुषा कुडेकर, निलम कोहचाडे सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles