
नागपूर विद्यापीठात डिगऱ्या धुळखात एडव्होकेट भुपेश तभाने यांचा आरोप
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची मतदाता सूचीमध्ये नाव नोंदविण्याकरिता डिग्री अनिवार्य आहे आणि नागपूर विद्यापीठाची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यासाठी मतदाता सूची तयार करण्याचे कार्य जारी आहे. परंतु अनेकांकडे डिग्रीची प्रत नाही. विद्यापीठात खरे तर डिग-या धुळखात असल्याचा आरोप अँड.भुपेश तभाने यांनी पत्रपरीषदेत केला याप्रसंगी माजी आमदार उपेंद्र शेंडे यांची मंचावर उपस्थित होते.
अधिवक्तांनी सन 2019 मध्ये pgtd परीक्षा पास केली आहे. पण कॉलेज नी आज पर्यंत डिग्री दिली नाही. व एनओसी जारी केली आहे. व सूचना दिली आहे की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागात जाऊन आपली डिग्री प्राप्त करावी. मी पूर्णपणे प्रयत्न केले असता मला आज पर्यंत डिग्री मिळाली नाही. नागपूर विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांनी डिग्री प्राप्त करण्यासाठी अग्रीम भूगतान केले आहे. तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत डिग्री पोहोचवावी अशी आमची मागणी आहे. विद्यापीठात जाऊन आम्ही डॉ. राजू हिवसे कुलसचिव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली. त्यांनी विचारले मला काय करायला पाहिजे ? हा प्रश्न वकील साहेबांना विचारला असता त्यांनी असे उत्तर दिले.