
नागपूर जि.प.ने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय थांबवावा; जिल्हाध्यक्ष प्रोटान
नागपूर: जिल्हा परिषद शिक्षण समिती नागपूर यांनी नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षकाच्या रिक्त असणाऱ्या जागेवर पाच हजार रुपये मानधनावर कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला आहे जिल्हा परिषद नागपूर मध्ये रिक्त जागा असणारी पदे हा भरण्याचा भरती करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आलेला आहे.
सदर रिक्त असणारी पदे ही बिंदू नामावलीनुसार एससी, एसटी, ओबीसी, एनटी ,व्ही जे एन टी , एसबीसी ,खुल्या संवर्गाची असतात या बिंदूवर संविधानाने दिलेल्या कलम 340 ,341 ,342 नुसार नवनियुक्त कर्मचाऱ्यांची शिक्षकांची भरती केली जाते विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान म्हणून आपण जिल्हा परिषदेकडे रिक्त असणारी पदे महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी घेऊन पूर्ण वेतनावर भरण्याची कारवाई करण्यात यावी आपल्या जिल्हा परिषद घेतला निर्णया सविधान विरोधी असल्याने याचा परिणाम एससी, एसटी ,ओबीसी ,एनटी व्ही जे एनटी ,एसबीसी व खुल्या प्रवर्गातील डीएड, बीएड पदवीधारकावर अन्याय होऊ शकतो म्हणून कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय ताबडतोब थांबवावा.
अन्यथा या विरोधात भविष्यात संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मी बर्वे यांना निवेदन दिले निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रोटान डॉ. राजेंद्र ढवळे, उपाध्यक्ष प्रा. उमेश जनबंधू , कोषाध्यक्ष भीमराव लांजेवार यांनी निवेदन दिले.