वानाडोंगरीच्या आकाशला विदेशातील शिष्यवृत्ती

वानाडोंगरीच्या आकाशला विदेशातील शिष्यवृत्ती



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, हिंगणा

हिंगणा : कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांबद्दल अनेकदा अनास्थाच बाळगली जाते. परंतु,उपराजधानीतील औद्योगिक अभियांत्रिकीची पदवी घेतलेला युवक या क्षेत्राकडे वळला. गेल्या नऊ वर्षातील त्याच्या कृषीविषयक कामाची दखल थेट दोन देशांनी घेतली असून त्याला शिष्यवृत्ती देऊ केली आहे.

हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी महाजनवाडी मधील आकाश नवघरे याने रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातून औद्योगिक अभियांत्रिकी मध्ये पदवी घेतली आहे. ब्रिटिश सरकारच्या वतीने दरवर्षी इंग्लंडमध्ये कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी चेवनिंग स्कॉलरशिप दिली जाते.यासाठी सुमारे १६० देशातून ७० हजार विद्यार्थी अज॔ करतात.त्यातील मोजकेच म्हणजे एक ते दोन टक्के विद्यार्थीच या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.

यावर्षी उपराजधानीतील आकाश वासुदेवराव नवघरे यासाठी पात्र ठरला ठरला आहे.आकाश गेल्या आठ-नऊ वर्षांपासून देशी बियाणांचे संवध॔न करणाऱ्या,सेन्द्रीय शेतीचा प्रसार करणाऱ्या “बिजोत्सव” या उपक्रमाशी जुळला आहे.आकाशने शेतीची आर्थिक गणिते जाणून घेण्यासाठी अथ॔शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली.अन्न आणि विकास यावरील अभ्यासासाठी त्याने इंग्लंडमधील “इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज”मध्ये प्रवेश घेतला.नेमके त्याचवेळी “जाॅईंट जपान वलड॔ बॅंक”शिष्यवृत्ती देखील त्याला मिळाली.

भारतातून केवळ दोनच व्यक्तींना ती मिळाली असून त्यात वानाडोंगरी मधील आकाश नवघरे व दिल्ली येथील भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कनिका दुआ यांचा समावेश आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles