
दाभा रिंगरोडवर जड वाहन उभे करणे बंद करण्याची मनसेची मागणी
वाडी: शहरातील दाभा वस्तीतून कृषी नगरकडे जाणा-या ,स्कूलबस, कार, बाईक हे मोठ्या संख्येने रिंग रोड कडे येणे जाणे करीत असतात त्या रिंग रोड कॉर्नर वर उभे ट्रक असतात, त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते कारण एक तर कृषि नगर चौकात सिग्नल नाही नगरसेवकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जसे दभा चौकात सिग्नल लावून अपघातावर नियंत्रण आणू शकलो तसेच याकडे जीवीत हानी होण्यापूर्वी लक्ष देणे जरुरी आहे.
दररोज ट्रक कृषि नगर चौकात ट्रक उभे असल्यामुळे वाडी कडून येणारे वाहन दिसत नाही त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो कारण जाणारा व्यक्ती हा वाडी कडे आणि नागपूर कडे जाऊ शकतो कृषि नगर मधून वाडी कडे जनाऱ्याचां अपघात होऊ शकतो ट्रक उभे असल्यामुळे वाडी कडून येणारे वाहन दिसत नाही. हा त्रास जनतेला मोठ्या प्रमाणात असतात शाळेतील मुले आणि अनेक जनता या मार्गाने मोठ्या प्रमाणात ये जा करीत असताता वेळीच उपाय योजना केल्या तर अपघात टाळू शकतो.
मनसेनी गिट्टीखदान ट्रॅफिक पोलिस स्टेशनला एकदा निवेदन दिले होते. मनसे तर्फे विनंती करण्यात येत आहे की कृषि नगर चौकाच्या बाजूला उभे ट्रक ठेवणे बंद करावे अन्यथा मनसे तर्फे आंदोलन करण्यात येईल याची खबरदारी पोलीस प्रशासानाने घ्यावी.