
राजकन्या अर्जुन सूर्यवंशी यांना आचार्य पदवी प्रदान
नागपूर: शहरातील प्रा. राजकन्या अर्जुन सूर्यवंशी ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस डिग्री कॉलेज नंदनवन नागपूर येथे इतिहास विषयाची प्राध्यापक असून त्यांनी “सर सय्यद अहमदखान यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान-एक ऐतिहासिक विश्लेषण” या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे प्रबंध सादर केला असता त्यांच्या प्रबंधाला मान्यता देण्यात आली असून त्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा.राजकन्या सूर्यवंशी यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस डिग्री कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. नरेंद्र राठोड हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. नरेंद्र राठोड आणि पती महेशकुमार शहारे व आई-वडिलांना दिलेले आहे. प्रा. राजकन्या सूर्यवंशी यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस डिग्री कॉलेजचे प्राचार्य धर्मेंद्र तुरकर आणि सहकारी प्राध्यापक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.