कथ्थक नृत्यातून गुरुंना आदरांजली.
_गुरूपोर्णिमा निमीत्ताने नुपूर कथ्थक केंद्रातर्फे रंगला आराध्य कार्यक्रम_
नागपूर: नुपूर कत्थक केंद्र प्रस्तुत,
विदर्भ हिंदी साहित्य, मोर भवन, सिताबर्डी नागपूर येथे नुकत्याच झालेल्या १३ जुलै रोजी, सायंकाळी ६:३० वाजता. नुपूर कथ्थक केंद्रातर्फे “आराध्य “हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. सर्वप्रथम गणेश वंदनांनी कार्यक्रमाची सुरवात झाली.
पुढे ताल, तीन ताल, ताल रूपक, ताल एक ताल, श्रीरामचंद्रांचे भजन व तराना अशी विद्यार्थीनींनी प्रस्तुती दिली. शेवटी, गुरु स्व. डॉ.साधनाताई नाफडे यांना स्मरण करून, कथ्थक नृत्यांगना व नूपुर कथ्थक केंद्राच्या संचालिका रूही मासोदकर यांनी कृष्णावरील माखन चोरी हा गतभाव प्रस्तुत करुन दर्शकांचे मन मोहून टाकले. कार्यक्रमाचे संचालन कु.अमृता हडप यांनी केले. चाहत्यांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आस्वाद घेतला असून कार्यक्रमाची सांगता झाली.