ध्यान,योग्, मानसिक तणाव मुक्तीसाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

ध्यान,योग्, मानसिक तणाव मुक्तीसाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शिवासायन्स ट्रस्ट गोवा, यांच्या नागपूर शाखेतील साधकांनी ध्यान, योग, तणाव मुक्त जीवन यासाठी दोन दिवसीय शिबिराचे विशेष आयोजन दिनांक 23, आणि 24 जुलै शनिवार व रविवारला नागपुरातील पराते हॉल, औरेंज सिटी हॉस्पिटल समोर खामला, येथे दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत यावेळेत करण्यात आले आहे.

कोरोना महामारी नंतर झालेले शारीरिक, मानसिक बदल यामुळे अनेक प्रकारच्या आजाराची तीव्रता वाढली आहे. त्यात शहरी भागातील धावपळ, कामाचा, अभ्यासाचा तणाव, मोबाईल चा अतिरेकी वापर यामुळे येणारे नैराश्य त्यामुळे होण्याऱ्या अघटित घटना या सर्व बाबींवर आपल्या अलौकिक योगिक साधने द्वारे मानसिक स्वास्थ्य व त्या योगे शारीरिक स्वास्थ्य सुधारावे यासाठी स्वयं सिद्ध योगी श्री भैयाजी महाराज यांचे मार्गदर्शनाचा लाभ नागपुरकरांना व्हावा.

यासाठी नागपुरातील त्यांच्या शिष्य परिवाराने “गुरुपौर्णिमा” यापर्वाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे निशुल्क आयोजन केले असून सर्व नागपूरकरांनी या दोन दिवसीय योग शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन नागपुरातील गौरव कालबांडे, सुशील कालबांड़े, स्वप्निल लांबडे, कु.समीक्षा जैन, श्रीमती स्मिता राने, आकाश तांबेकर आदींनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles