
मुख्याध्यापक संघाची माध्यमिक शिक्षणाधिकारी काटोलकर यांच्यासोबत बैठक
गजानन ढाकुलकर
हिंगणा- राज्य मुख्याध्यापक सयुंक्त महामंडळाचे अध्यक्ष मारोती खेडेकर, जिल्हाध्यक्ष सुनील कुर्रेवार,कार्याध्यक्ष राम बांते, सचिव हरिभाऊ खोडे , भागवत माटे, प्रसिद्ध प्रमुख सज्जन पाटील व पदाधिकारी यांनी विविध समस्येवर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांच्यासोबत बैठक घेऊन मुख्याध्यापकांना भेडसावणाऱ्या विविध समस्येकडे शिक्षणाधिकारी काटोलकर यांचे लक्ष वेधले.
त्यामध्ये सत्र २०२०-२१ ची संच मान्यता देतांना विद्यालयात प्रत्यक्षात दाखल विद्यार्थ्यांची नोंद घेण्यात यावी.शालेय पोषण आहारातील देय अनुदानाच्या प्रचलित दरात वाढ करण्यात यावी. शालेय. पोषण आहार शिजविणा-या मदतनीसांना शासकीय नियमाप्रमाणे किमान मजुरी देण्यात यावी. विद्यालयाच्या खाते मान्यता वर्धित प्रकारचा निपटारा लवकर करण्यात यावा.१०० टक्के अनुदानित विद्यालयांना कायमस्वरूपी बोर्ड मान्यता देण्यात यावी. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे.या सारख्या प्रशासकीय समस्येवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या सभेचे संचालन राम बांते यांनी तर आभार सचिव हरीभाऊ खोडे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, विलीन आरघोडे, यशवंत डोंगरे,पौर्णिमा मेश्राम, युवराज शंकरपुरे,आनंद गाणार, सुरेश बोबडे,अनिल गिरी, चंदा खुसपरे, माधुरी कन्नाके, सिध्दार्थ गजभिये व सुरजसिंग राठोड,उपस्थित होते.