
घोडेघाटवासी काढतात नदी पात्रातून वाट; सरपंच शुभम उडान
गजानन ढाकुलकर
हिंगणा :-हिंगणा तालुक्यातील मौजा घोडेघाट येथील शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षापासून काढावी लागते नदीच्या पात्रातून जीवघेणी वाट. दर वर्षी पावसाळा सुरु झाला की, नदी पूर्ण भरून वाहतात व शेतामध्ये सुदद्धा पाणी शिरते.
त्यामुळे शेती कशी करायची हा मोठा प्रश्न येथील शेतकऱ्या समोर पडला व हा निसर्ग सुद्धा साथ देत नसल्यामुळे शेतकरी हवालदीला झालेला आहे.व आणी दरवर्षीची ही समस्या आहे .आणि आमच हे सर्व शासन प्रशासन कागदो पत्री लिहून नेतात परंतु तेथील समस्या दूर होत नाही.घोडेघाट येथील शेतकरी महिला मंजूर यांना त्या रस्तानी एकट जाता येत नाही. आपला जीव मुठीत घेऊन त्यांना नदीतून शेतात ये-जा करावी लागते व नदीला संरक्षण भिंत नसल्या मुळे त्या नदीचे पाणी पूर्ण गावामध्ये शिरते त्याच्या मुळे लोकाच्या घरचे नुकसान होत असल्यामुळे दर वर्षी होणा त्रास हा कधी कमी होईल अशी सर्व नागरिक विचारणा करीत आहे.
अशी माहिती ग्राम पंचायत घोडेघाट चे युवा सरपंच शुभम उडान यांनी दिली व शासन प्रशासनाला या बाबीकडे लक्ष देऊन समस्या कायमची दूर करून देण्याची विनंती गावकऱ्यांच्या वतीने सरपंच शुभम उडान यांनी केली आहे.