
गांधीबाग सहकारी बँक लि. नागपूरच्या कर्मचा-यांचे पगारात 12% वाढ
नागपूर : गांधीबाग सहकारी बँक लि. नागपुर ही नागपूर शहरातील मागील 60 वर्षापासुन कार्यरत एक प्रगतीशिल व लौकीक प्राप्त बँक असुन या बँकेने सन 2021-2022 मध्ये जवळपास रु. 410.00 कोटी व्यवसायाचे उद्यीष्ट पुर्ण केले आहे. या 16.80% असुन बँकेला मागील दहा वर्षापासून सतत ऑडीट वर्ग “अ” प्राप्त झालेला आहे. बँकेचा निव्वळ नफा रू. 137.19 लाख व सि.आर. ए. आर. बँकेचा प्रति कर्मचारी व्यवसाय रु. 6.83 कोटी आहे. नुकताच बँक व महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन यांच्यात पगारवाढीचा करारनामा कार्यक्रम बँकेच्या मुख्य कार्यालयांत पार पडला. या करारनाम्यानुसार कर्मचा-यांच्या पगारामध्ये सरासरी 12% पगारवाढ करण्यात आली.
यामध्ये कनिष्ठ श्रेणी ते वरिष्ठ श्रेणीची पगारवाढ रु. 2500/- ते 9500/- च्या दरम्यान झाली. याप्रसंगी कार्यक्रमास बँकेचे मा.अध्यक्ष रविन्द्र दुरगकर, उपाध्यक्ष प्रल्हाद गावंडे जेष्ठ संचालक मनोहर मानकर, रतनलाल लाहोटी, संचालक सर्वश्री, विवेक नागुलवार, परिक्षित चिलाटे, अशोक खाडे, मोहन पडोळे, अरुण टिकले, संकेत दुरगकर, अरविंद गायकवाड, डॉ.सुभाषचंद्र बजाज, विठ्ठल नारनवरे, मनोज कारिया, रजनिकांत जिचकार, पंकज खंडागळे, आलोक भगत, डॉ.सौ.मिनाक्षी ठाकरे, श्रीमती. सुमित्रा गुप्ता, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास व्यवहारे तसेच महाराष्ट्र राज्य को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष मिलींद घोरमाडे, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत रोठे, उपाध्यक्ष प्रशांत डाहाके असिस्टंट सेक्रेटरी प्रविण फुके, माजी अध्यक्ष विजय शहाणे, कर्मचारी प्रतिनिधी अश्विन डवले, युनियनचे इतर सदस्य व बँकेचे इतर कर्मचारी/अधिकारी उपस्थित होते. या पगारवाढीमुळे बँकेच्या सर्व कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण असुन या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत डाहाके, संचालन प्रविण फुके व आभार प्रदर्शन आकाश डंभारे यांनी केले.