“यांनीच दिला चळवळीला हात” या अंकाचे प्रकाशन रविवारी

“यांनीच दिला चळवळीला हात” या अंकाचे प्रकाशन रविवारी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: कोरोना महामारीच्या काळात आंबेडकरी चळवळीतील अनेक शिलेदारांना प्राण गमवावे लागले. त्यांच्या कार्यकर्तृत्वा विषयी कृतज्ञता व आदरभाव व्यक्त करणाऱ्या “यांनीच दिला चळवळीला हात” या सम्यक थिएटर द्वारा प्रकाशित वार्षिकांक २०२०-२१-२०२२ चे प्रकाशन रविवार दि.२४ जुलै २२ रोजी, सायंकाळी ५.३० वाजता. मधुरम सभागृह, हिंदी मोर भवन, सीताबर्डी नागपूर येथे होणार आहे.

प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. रणजित मेश्राम हे भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सचिव व ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. प्रदीप आगलावे, वार्षिकांकाचे मुख्य संपादक प्रा सुनील रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन समारंभ संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्यक थिएटरचे व्यवस्थापक नरेश साखरे मांडणार आहेत. मागील दोनअडीच वर्षांत कोरोना महामारीच्या जागतिक आपदेत आंबेडकर चळवळीने अनेक खंदे विचारवंत, कार्यकर्ते, साहित्यिक, कलावंत गमावले. या दिवंगत साथीदारांनी स्वतःच्या कर्तबगारीने आपले अस्तित्व निर्माण करून आंबेडकरी चळवळीला मोलाचे योगदान दिले. त्यांचे हे योगदान चिरस्मरणीय व्हावे व हयात असलेल्या नव्या पिढीला त्यांचे कृतज्ञतापूर्ण स्मरण राहावे या हेतूने “सम्यक वार्षिकांक २०२०-२१-२२” या अंकात आंबेडकरी चळवळीतील सर्व दिवंगत साथीदारांवरील मृत्यूलेख एकत्रित करुन “यांनीच दिला चळवळीला हात आम्ही कृतज्ञ आहोत” या अंकाची निर्मिती करण्यात आली आहे . प्रस्तुत समारंभाला कोरोना नियमावलीचे पालन करुन जनतेने उपस्थित राहावे.
असे आवाहन सम्यक थिएटर च्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles