मा.प्रधानमंत्री व मा. मुख्यमंत्री यांना तहसिलदार मार्फत महागाई कमी करण्या बाबत राष्ट्रवादीचे निवेदन

मा.प्रधानमंत्री व मा. मुख्यमंत्री यांना तहसिलदार मार्फत महागाई कमी करण्या बाबत राष्ट्रवादीचे निवेदनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- आधी पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रचंड वाढवायचे आणि टिकेचा भडिमार झाल्यानंतर ते थोडेफार कमी
केल्याचे भासवून दिलासा दिल्याचे चित्र निर्माण करायचे असेच वातावरण सध्या महाराष्ट्र राज्यात निर्माण झाले आहे .एकीकडे गॅस सिंलीडर महाग करण्यात आले. दिनांक १८ जुलै २०२२ पासून अन्नधान्यावर ५ ट्क्के जीएसटी लावलेली आहे. यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू महागल्या आहेत. किमान अन्नधान्यावर तरी जीएसटी लावू नये. त्यामुळे ५ रुपये द्ययाचे व १०० रुपये घ्यायचे अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महिलांच्या दैनंदिन जीवनात गॅसचे महत्व फार मोठे असून दिवसेंदिवस गॅस सिंलीडरचे दर गगणाला भिडले आहे. स्वयंपाकासाठी घराघरात सिंलीडरचा वापर होतो. सध्या सिंलीडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केल्यामुळे गृहिणीचे बजेट कोडमडले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू दुध, दही, आटा, दाळ, तांदुळ आदी आवश्यक वस्तूवर जीएसटी लागु झाल्यामुळे महागाई आणखीनच वाढलेली आहे.

महागाईचे दररोज चटके बसू लागल्यामुळे आता जगायचे कसे ? असा प्रश्‍न जनतेला पडलेला आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. करीता पेट्रोल, डिझेल व सिंलीडर गॅसचे भाव कमी करुन दुध, दही,आटा, दाळ, तांदुळ आदी आवश्यक वस्तूवर लावलेली जीएसटी पूर्ववत करावी त्यामुळे यामुळे जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा दयावा त्याच प्रमाणे महावीतरण कंपनीची मागणी व महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची मान्यता या आधारे राज्यातील सर्व २.८५ कोटी वीज ग्राहकावर इंधन समायोजन आकार या नावाखाली २०टक्के प्रचंड दरवाढीचा बोजा ,जुलै २०२२ पासून ५ महिन्यासाठी लावण्यात आला आहे,म्हणजेच सरासरी १.३० रुपये प्रति युनिट या प्रमाणे वीज दरवाढ लावण्यात आली आहे.ही दरवाढ रद्द करण्यात यावी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान बाबत शेतकरी यांना १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles