प्रधानमंत्री आवास योजनेच्या आदेश आदेश वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम

प्रधानमंत्री आवास योजनेच्या आदेश आदेश वाटप व मार्गदर्शन कार्यक्रमपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_३८१ लाभार्थ्यांना आदेशाचे वाटप_

गजानन ढाकुलकर

हिंगणा ( बुट्टीबोरी ) दि. २२ जुलै प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत नगर परिषद बुटीबोरी च्या हद्दीतील एकूण नऊ प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन संवेक्षण मोहीम राबविण्यात आली. नागरिकांना सर्व निकषांची माहिती देऊन त्याचे कागदपत्री पूर्तता करण्यात आली व त्यानंतर अर्ज भरून घेण्यात आले योजनेच्या घटक क्रमांक चार बीएलसी स्वतःच्या मालकीच्या जागेवर वैयक्तिक स्वरूपाचे घरकुल बांधकाम अंतर्गत पहिल्या टप्प्याचे३८१ लाभार्थ्याची मंजुरी प्राप्त झाली त्याच अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मंजुरीचे वाटप आज दि.२२ जुलै रोजी दुर्गादेवी मंदिरात घेण्यात आले.

हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ मेघे यांच्या प्रमुख उपस्थितीत व नगर परिषद चे नगरध्यक्ष बबलूभाऊ गौतम यांच्या अध्यक्षतेखाली ३८१ लाभार्थ्यांना आदेशाचे वाटप करण्यात आले यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष अविनाश गुजर, शिक्षण सभापती विनोद लोहकरे, पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे, नियोजन सभापती मनोज ठोके, आरोग्य सभापती मुन्ना जयस्वाल, बाल कल्याण सभापती संध्याताई आंबटकर,मुख्याधिकारी आर्शिया जुही, प्रशासकीय अधिकारी सुभाष श्रीपदवार,नगरसेवक प्रवीण शर्मा,आकाश वानखेडे, नगरपरिषद चे नगरसेवक नगरसेविका या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रहनिर्माण करून गोरगरिबांना घर मिळावे यासाठी ही योजना सुरू आहे असे मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. आमदार समीर मेघे म्हणाले की पहिल्या टप्प्यातील घटक क्रमांक चार साठी ३८१ लाभार्थ्यांचा रु.२७५३.१७ लक्ष रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर बनवण्यात आला यामध्ये केंद्र शासनाला प्रकल्प हिस्सा ५७१. ५० लक्ष राज्य शासन प्रकल्प हिस्सा ३८१.00 पॉईंट लक्ष आणि लाभार्थी हिस्सा १८00.६७ लक्ष आहे बीएलसी घटकाचा ३८१ .00ला लाभार्थीपहिला सविस्तर प्रकल्प अहवाल दिनांक ३० मार्च दोन हजार बावीस रोजी केंद्रीय संनियंत्रण समितीच्या ५२ व्या मीटिंगमध्ये अंतिम मंजुरी प्राप्त आहे मंजुरी आदेश देण्यात आला.

एकूण लाभार्थी पैकी सर्वसाधारण ८४ लाभार्थी अनुसूचित जाती ५६ लाभार्थी अनुसूचित जाती जमाती ६० लाभार्थी इतर मागासवर्गीय १८१ लाभार्थी असे एकूण ३८१लाभार्थ्यांमध्ये अल्पसंख्यांक ३१ लाभार्थी आहे ३८१ लाभार्थी पैकी २७२ पुरुष आणि १०९ महिला लाभार्थी यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. बुटीबोरी नगर परिषद चे नाव प्रधानमंत्री आवास योजना शहराच्या सिस्टम मध्ये फार उशिरा नोंदवाण्यात आले असल्याने सर्व प्रक्रिया विलंबाने सुरू झालेल्या होत्या त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्याच्या मंजुरीला उशीर झालेला आहे परंतु या क्षेत्राचे आमदार समीर मेघे आणि नगर परिषदेचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या पुढाकाराने आणि परिश्रमाने ही योजना आज अमलात आली आहे पंतप्रधान आवास योजना दुसऱ्या टप्प्याचे अर्ज स्वीकारणे सुरू आहे १५ ऑगस्ट २२ पर्यंत नागरिकांनी आपले अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह सोबत नगर परिषद कार्यालयात बुटीबोरी येथे सादर करावे असे आवाहन नगर परिषद कार्यालया तर्फे करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles