चंद्रपूर जिल्हाधिका-यावर कारवाईसाठी २८ रोजी मुंबई येथे सुनावणी

चंद्रपूर जिल्हाधिका-यावर कारवाईसाठी २८ रोजी मुंबई येथे सुनावणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- दि.१६/०६/२०२२ ला नोटीस जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देऊन १५ दिवसात अहवाल मागीतले होते,मात्र आजपर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल दिलाच नाही. तलाठी विनोद खोब्रागडे यांनीच पुराव्यासह तक्रार कुंसुबीचा २४ आदिवासीचा अन्याय,अत्याचार विरुद्ध फौजदारी कारवाई साठी रिपोर्ट दिली होती. लेखी युक्तिवाद आजच शपथपत्रासह रजिस्टर करुन मा. आयोगाला दिले असून,दि.२८/०७/२३ ला खतरनाक आर्गुमेन्ट स्वतः विनोद खोब्रागडे करनार आहे,व महसूल अधिकारी यांची पोलखोल करणार आहे.

तलाठी विनोद खोब्रागडे यांनीच मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा आदिवासीचा महाघोटाळा,उघडकीस आनल्यामुळे व त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट फौजदारी पीटीशन उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर, नोटीस इश्यू झाल्यावर, सुडभावनेने,व आकसबुद्धिने,पदाचा व अधिकाराचा गैरवापर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी करून, तलाठी विनोद खोब्रागडे हे अनुसूचित जातीचे कर्मचारी आहे,हे माहिती असूनही प्रकरण दाबण्यासाठी दुसऱ्या प्रकरणातील गौण दस्तऐवजचा आधारे चौकशी न करता,बोगस आदेश करून अन्याय केला आहे.म्हणूनच तलाठी विनोद खोब्रागडे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर विरुद्ध अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 कलम 4,3(1)(5) नुसार फौजदारी कारवाई साठी माननीय आयोगाकडे रिपोर्ट केली होती.२८जुलै २०२२ला या बाबत मुंबईला सुनावणी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles